दाभाडी नदीवर गतवर्षी सिमेंट बांधारा बांधण्यात आला. जलसंधारण उपविभाग किनवट प्रशासनाचे दुर्लक्ष आणि गुत्तेदाराने केलेल्या निकृष्ठ कामामुळे बांधारा तुटून शेतात पुराचे पाणी घुसून शेतातील उभ्या पिकांसह जमिनी खरडून गेल्या.
९ जुलै रोजी झालेला पाऊस अगदी जोराचाच होता. त्या पुराच्या पाण्याने बांधार्याच्या निकृष्ठ कामाची पोलखोल केली. बांधार्याची तुटफूट झाल्याने शेतीतील उभे पिक तर वाहून गेलेच.
शिवाय आजूबाजूच्या जमिनिही खरडून अभूतपूर्व नुकसान झाले.
गतवर्षीच्या पावसातही बांधार्याची तुटफूट झाली होती.
शेतकर्यांनी ओरड केल्यानंतर थातूरमातूर वरवर डागडुजी केली होती.
परंतु यावर्षीच्या पावसाळ्यात व्हायचे तेच झाले.
बांधारा निर्माणाधिन असतांना गुत्तेदाराने जिल्हाधिकारी, तहसिलदार, अभियंते,
आमदारांना आणून पाठ थोपटून घेतली. शेतकर्यांना विश्वासात न घेता स्थळ निश्चीत केले.