Ticker

6/recent/ticker-posts

महावितरणचा भोंगळ कारभार, दोन दिवसापासुन मांडवी कोठारी सिंद. गाव अंधारात


महावितरणचा भोंगळ कारभार, दोन दिवसापासुन मांडवी कोठारी सिंद. गाव अंधारात


किनवट/ मांडवी प्रतिनिधी:-
ता.30
 
मांडवी जिल्हा परिषद गटाअंतर्गत कोठरी सिंध या गावात मागील काही दिवसापासून वीज ही वारंवार खंडित होत होती.पण दोन दिवसापूर्वी गावात वीज बिल थकीत आहे 

व गावातील ग्रामपंचायतीची वीज बिल ही मागिल काही महिन्या पासुन थकीत आहे कारण ओला दुष्काळ  आहे शेतकरी त्रस्त आहे त्यामुळे गावातील विज बिल भरले जात नाही

 या कारणाने दिनांक 29/7/2022शुक्रवार या दिवशी सकाळ पासुन वीज पुरवठा खंडित केला आहे तो गावातील वीज बिल पूर्णपणे वसूल केल्यावर ती वीज पुरवठा सुरू करण्यात येईल. अशा तुलघी  कारभरामुळे कोठारीवासी हवालदील झाले आहे. 

मांडवी परिसरात मागील काही  दिवसापासून  अतिवृष्टी असून शेतामध्ये पूर्ण पाणी साचले असून 

शेतकरी वर्ग पूर्णपणे घरी बसलेला असून काही मजुरांना मजुरी लागत नसल्यामुळे अशा परिस्थिती वीज बिल भरणे शेतकरी व मोल मजुरी करणारे गावकरी

 यांनाअशक्य आहे. ग्रामपंचायतीत प्रशासकीय कारभार असल्याने बिल काडण्यास वेळ लागत आहे कारण ग्रामपंचायीकडे 

या पूर्वी  कोणतीही नोटिस किंवा  पत्र देण्यात आले नाही पुर्व सुचना न देताच विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला व गावकऱ्यांना वीज वापरताना मीटर बसविणे व नियमित बिल भरणे या साठी जनजागृती गावात केली 

गेली नाही व गावकऱ्यांना बिलभरा नाहीतर गावातील वीज पुरवठा खंडित केला जाईल असे ग्रामपंचायत  येथे सभा घेऊन गावकऱ्यांना सूचना देण्यात आली नाही. व असे अचानक गावाची वीज पुरवठा खंडित केला जात आहे.

पावसाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये  ओला दुष्काळ पडलेला असून शेतकऱ्याकडे सध्या आर्थिक परिस्थिती बेताची असून 

मांडवी परिसरातील महा वितरण कार्यालयाचे बेजबाबदार कारभाराचे शासनाने तात्काळ लक्ष देऊन कोठारी सिंध

 या गावातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी तेथील सर्व  गावकरी करीत  येत आहे 

विशेष बाब म्हणजे कोठारी येथे आरोग्य शिबीर सुरू आहे व शस्त्रक्रिया सुरू आहे गावात .