Ticker

6/recent/ticker-posts

मांडवी येथील वनपरिक्षेत्रातील भ्रष्टाचाराची चौकशी करा - शेंडे


मांडवी येथील वनपरिक्षेत्रातील  भ्रष्टाचाराची चौकशी करा - शेंडे 

किनवट = (ता. प्रतिनिधी) किनवट तालुक्यातील वनपरिक्षेत्र मांडवी अंतर्गत सण 2017 ते 2022 या कालावधीत झालेल्या व सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी 

योजनेच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितावर कार्यवाही करावी ही मागणी घेऊन प्रहार संघटनेचे तालुका प्रमुख मधुकर शेंडे यांनी किनवट येथे उपविभागीय कार्यालयासमोर उपोषण आरंभीले आहे .
       

 दिनांक 1 जुलै पासून किनवट येथील उपविभागीय कार्यालयासमोर प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष मधुकर शेंडे यांनी वनपरिक्षेत्र मांडवी अंतर्गत झालेल्या रोजगार हमी योजनेच्या कामाच्या चौकशीसाठी उपोषणास बसले आहेत.

 त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे कि, झालेले कामे ही बोगस मजुराची नावे लिहून रक्कम उचल केलेली आहे.

 सुरुवातीला कामावर प्रत्यक्ष 50 ते 60 मजूर होते नंतर ही कामे विस मजुरामार्फत कामे करून घेऊन बोगस मजुरांची कागदोपत्री नावे दर्शवून त्यांच्या नावाने केलेली उचल ही शासनाची फसवणूक केली आहे याप्रकरणी वेळोवेळी संबंधित विभागाकडे वरिष्ठांकडे याप्रकरणी चौकशी व्हावी अशी मागणी केली असता 

या प्रकरणात कोणीही दखल घेत नसल्याने मला अखेर उपोषणाचा पवित्रा घ्यावा लागला असे त्यांनी सांगितले या झालेल्या प्रकरणातील माझ्या समक्ष व्हिडिओ शूटिंगसह पोलीस बंदोबस्तात उच्चस्तरीय चौकशी व्हावी मजुरांची उलट तपासणी व्हावी. 

ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी हा गैरव्यवहार केला त्यांच्यावर गुन्हे दाखल करून शासनाची फसवणूक केलेली रक्कम वसूल करण्यात यावी. 

असे निवेदनात नमूद केले आहे. किनवट तालुक्यात अशाच प्रकारे अनेक ठिकाणी शासनाची कामे ठातुर मातुर करून निधी लाटल्या जातो वनपरिक्षेत्र मांडवी अंतर्गत झालेल्या व होत असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या झालेल्या भ्रष्टाचाराचा भांडा फोड प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष शेंडे

 यांच्यामार्फत होत असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होईल का? संबंधितावर गुन्हे दाखल होतील काय? याकडे परिसरातील जागरूक नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

त्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस असून प्रशासन त्यांची दखल घेत नसल्याची उपोषणकर्त्यांनी खंत व्यक्त केली आहे. 

याप्रकरणी सखोल चौकशी व्हावी यासाठी प्रदान मुख्य वनरक्षक महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी नांदेड, 

सहायक जिल्हाधिकारी किनवट व उपवनसंरक्षक नांदेड यांनाही निवेदनाच्या प्रति देण्यात आल्या असल्याचे शेंडे यांनी सांगितले.