Ticker

6/recent/ticker-posts

किनवट : तालुका कृषि अधिकारी कार्यालयाच्या वतीने हरित क्रांतीचे जनक दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषि दिनाच्या औचित्याने बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक व प्रत्यक्ष पेरणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले


तालुका कृषि विभागाच्या वतीने कृषि दिनी बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक व पेरणी

किनवट : तालुका कृषि अधिकारी कार्यालयाच्या वतीने हरित क्रांतीचे जनक दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषि दिनाच्या औचित्याने बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक व प्रत्यक्ष पेरणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
      

  यानुषंगाने तालुक्यातील कमठाला शिवारातील जयस्वाल यांच्या शेतात सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण पुजार, नांदेडच्या महिला व बालकल्याण विभागाच्या उप मुख्य कार्यकारी रेखा काळम-पाटील,

 पंचायत समिती माजी सभापती प्रतिनिधी दत्ता आडे, माजी उपसभापती कपिल करेवाड, गट विकास अधिकारी सुभाष धनवे, 

गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने, जिल्हा महिला व बाल विकास विभागाचे सांख्यिकी अधिकारी सुधीर सोनवणे , हदगावचे बाल विकास प्रकल्पाधिकारी उमेश मुदखेडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, 

बाल विकास प्रकल्पाधिकारी अश्विनी ठकरोड, पंचायत समितीचे कृषि अधिकारी शिवराम मुंडे, सिकंदर पठाण, अभियंता सचिन येरेकर, उत्तम कानिंदे आदिंचे स्वागत करून मूग पिकाची पेरणी केली.
  

     प्रारंभी किटक व बुरशी पासून बी-बियाणांचे संरक्षण व जीवाणू वाढ करून २० टक्के उत्त्पन्न वाढ करण्यासाठी पेरणीपूर्वी करावयाच्या बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक कृषि शास्त्रज्ञ जायभाए यांनी दाखविले. 
       

 यावेळी तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे, मंडळ कृषी अधिकारी   बुद्धभूषण मुनेश्वर (किनवट ), एलपलवाड (इस्लापूर ), कृषी पर्यवेक्षक शिवाजी जाधव, वैशाली भाटकर, गजानन ठेंगे,

 गजानन भालेवाड व सुजाता कानिंदे यांच्यासह सर्व कृषी सहाय्यक तसेच ग्रामसेवक अंभोरे, 

तलाठी पांढरे , युवराज पाटील आदिंची उपस्थिती होती.