Ticker

6/recent/ticker-posts

पावसाळा लागलाय... वीज यंत्रनेपासून सावध राहावे..- नागरिकांनी पावसाळ्यात वीज उपकरनापासून सावध राहावे. दिवसेंदिवस पावसाळ्यात विद्युत अपघात अधिकप्रमानात घडून येत आहेत


पावसाळा लागलाय... वीज यंत्रनेपासून सावध राहावे..


- नागरिकांनी पावसाळ्यात वीज उपकरनापासून सावध राहावे. दिवसेंदिवस पावसाळ्यात विद्युत अपघात अधिकप्रमानात घडून येत आहेत.

अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी पावसाळ्यात विद्युत यंत्रणेच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक वस्तूपासून सावध राहणे खूप गरजेचे आहे. 

जसे की,अतिवृष्टी,वीज वाऱ्याने तुटलेल्या वीजतारा, सर्व्हिस वायर, विद्युत उच्चदाब वाहिनीचे पडलेला खांब, फ्यूज बॉक्स,रोहित्र, 

स्विच बोर्ड,पत्र्याचे घर, शेतीपंपाची स्विच बोर्डला स्पर्श करू नये.तसेच घरातील ओलसर असलेली प्रत्येक विद्युत उपकरणे आदिंकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता असते.

जर का नागरिकांनी सावधगिरी बाळगल्यास या दुर्घटना टाळता येतात. 

ग्रामीण भागात शेतात किंवा रस्त्याने जातांना विशेषत: पहाटे किंवा रात्री चांगल्या दर्जाच्या टॉर्चचा वापर करणे गरजेचे आहे.

शेतात किंवा रस्त्यामध्ये तुटून पडलेल्या वीजेचे तार हटविण्याचे किंवा तारेजवळ जाण्याचे प्रयत्न करू नये.

पाऊस आणि वाऱ्याने तुटून झाडाच्या फांद्या वीज तारेवर पडतात. वीजखांब वाकतो व वीजतारा तुटतात.

त्यात वीजप्रवाह असल्याची शक्यता असल्याने अशा तारांपासून सावध राहावे.


वीजयंत्रनेपासून धोका निर्माण झाल्याची शक्यता असल्यास सबंधित लाईनमन किंवा महावितरण कार्यालयात संपर्क साधू शकता.तक्रार करण्याकरिता  टोल फ्री क्रमांक 18002333435
18001023435
1912


ग्राहकांचे तक्रारीचे निवारण करण्यासंबंधीचे नियम व कार्यपद्धती महावितरणच्या संकेत स्थळ:-
www.mahadiscom.in≥consumerportal>CGRF या वर उपलब्ध आहे.


- जितेंद्र चव्हाण ( महावितरण किनवट)