कांग्रेस पक्षाच्या ओबीसी विभागाचे राष्ट्रीय समन्यवक प्रमिल नाईक यांची गुजरात राज्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती !
किनवट तालुक्यातील दहेली तांडयाचे भूमिपुत्र प्रमिल विठ्ठलराव नाईक(जाधव)यांची काही महिन्यापूर्वी कांग्रेस पक्षाने ऑल इंडिया
कांग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून निवड केली होती.
महाराष्ट्रात युवक कांग्रेस व एनसयूआईच्या माध्यमातुन तळागाळा पासून पक्ष बांधनीचा दांडगा अनुभव असलेल्या प्रमिल नाईक
यांची निवड राष्ट्रीय स्तरावर होताच त्यांनी आपल्या कार्याची चुनुक दाखविली .खास करून ग्रामीण भागात शेवटच्या घटकापर्यन्त कांग्रेस पक्षाची विचारधारा रुजविन्याची
त्यांची धडपड पक्षश्रेस्ठीच्या नजरेतुन सूटली नाही म्हणून भारतीय राष्ट्रीय कांग्रेसच्या सन्मानिय अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्या शिफारिशीनुसार
त्यांची नियुक्ती आता थेट ऑल इंडिया कांग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे गुजरात राज्याचे प्रभारी म्हणून करण्यात आली आहे.
त्यांच्या राजकीय कार्यकर्तुत्वाचा आलेख दिवसेनदिवस वाढत असून कांग्रेस पक्षाच्या दिल्लीच्या राजकीय वर्तुळात त्यांनी आपले भरभक्कम स्थान निर्माण केले आहे.
त्यांच्या या निवड़ीबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण ,महाराष्ट्र राज्य कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, खासदार मुकुल वासनिक , महाराष्ट्र राज्य कांग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संजय राठोड ,आमदार अमरनाथ राजूरकर यांनी भावी राजकीय वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.