किनवट
कॉस्मॉपॉलिटन विद्यालय किनवट येथील मुख्याध्यापक डी. आर. बिच्चेवार हे 31 जुलै रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले असून निरोप समारंभ
प्रसंगी त्यांचा आहेर, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवुन सपत्नीक सत्कार करण्यात आला.
या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे जेष्ठ शिक्षक आर. व्ही घोरबांड, संस्थेचे सचिव पी. व्ही रामतिर्थकर, अध्यक्ष एन.व्ही रामतिर्थकर,
जेष्ठ शिक्षक बी. एस. मोहिते, प्रिती रामतिर्थकर, बी.एस. मोहीते, एस.बी गज्जलवार, वाय.एम.राठोड, पी.आर कदम, आर.आर. बारापात्रे, एस. डी बामणीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कॉस्मापॉलिटन विद्यालय किनवट येथे डी.आर बच्चेवार यांनी 35 वर्षे प्रदीर्घ सेवा पुर्ण केली. या काळात शाळेला अच्छे दिन आलेले आहे.
शारीरिक शिक्षक म्हणून तालुक्यात प्रसिद्ध होते. लवचिक, निर्भीड व्यक्तिमत्व, समयसूचकता, सडेतोडपणा हे त्यांचे विशेष.
यावेळी शालांत प्रमाणपत्र परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा शाळेतर्फे पारितोषिक देऊन सहपरिवार सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. एम पुराणिक, परिचय व कार्य गौरव बाळकृष्ण कदम यांनी केला. तर आर.एन बोलेनवार