Ticker

6/recent/ticker-posts

किनवट/प्रतिनिधी- किनवट नगर परिषदेने संपादीत केलेल्या जमिनीच्या मावेजापोटी श्रीमती गोपीकाबाई रामल्लू नेम्मानिवारांना दिडकोटी रुपये सभागृहाला अंधारात ठेऊन दिले


किनवट/प्रतिनिधी- किनवट नगर परिषदेने संपादीत केलेल्या जमिनीच्या मावेजापोटी श्रीमती गोपीकाबाई रामल्लू नेम्मानिवारांना दिडकोटी रुपये सभागृहाला अंधारात ठेऊन दिले. 

चार वर्षाच्या काळात अशी अनेक प्रकरणे आहेत की, अशाच आर्थिक व्यवहारात प्रचंड भ्रष्टाचार होत असल्याबद्धल नगराध्यक्षांसह मुख्याधिकार्‍यांना सभागृहात सांगितल्यानंतरही त्या घोटाळेबाज कर्मचार्‍यांना अभयच मिळाले. 

येत्या २४ तासात त्या कर्मचार्‍यांवर निलंबनाची कार्यवाही न केल्यास १४ नगरसेवकं सदस्यत्वाचा सामुहीक राजीनामा देणार असल्याच्या ईशार्‍याचे

 पत्र १२ आॅगस्ट रोजी नगराध्यक्षासह प्रभारी मुख्याधिकार्‍यांना दिल्याचे प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रात सत्ताधारी भाजपासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी नमूद केले आहे.
    
  सभागृहातील जहीरोद्दीन खान खैरोद्दीन खान, साजिदखान निसारखान, अभय भीमराव महाजन, श्रीनिवास किशनराव नेम्मानिवार, शिवाजी निवृत्ती आंधळे, सौ.अनिता शिवा क्यातमवार, सौ.रजनी नरेंद्र सिरमनवार, कु.पुजा बालाजी धोत्रे, राहत तब्बसूम शफीयोद्दीन काझी, 

श्रीमती जिजाबाई सखाराम मेश्राम, ईमरानखान ईस्साखान, व्यंकट गोपालराव नेम्मानिवार आणि स्विकृत सदस्य प्रविण ईंद्रसींग राठोड या नगरसेवकांनी टोकाची भूमिका घेतली  आहे. 

भ्रष्टाचाराचा कलगीतुरा चालवणार्‍या कर्मचार्‍यांवरच प्रशासनाची धुरा हाकल्या जात असेल तर नगराध्यक्षांसह मुख्याधिकार्‍यांना एक आव्हानच म्हणावे लागेल. 

भ्रष्टाचाराची चिड असलेले नगरसेवक राजीनाम्याच्या निर्णयावर शेवटपर्यंत ठाम असणार आहेत. आज तातडीची बैठक पार पडली.

 कोणत्या निर्णयावर सभागृह पोहोचले हे वृत्त पाठवेपर्यंत कळू शकले नाही. 

त्या दोन कर्मचार्‍यांचे निलंबन होणार की भ्रष्टाचार मुक्त प्रशासनासाठी टोकाचा पावित्रा घेणार्‍या नगरसेवकांचे राजीनामे मंजूर होणार याकडेच तमाम नगरवाशियांचे लक्ष लागून आहे.