सध्या देशाचे पंतप्रधानांनी सांगितल्या प्रमाणे हर घर तिरंगा,हर घर झेंडा....या मोहिमेत गावा गावात घरोघरी नागरिक तिरंगा तर घरावर लावत तर आहेच पण शासकीय कार्यालयात तिरंगा ध्वज लावणे बंधनकारक आहे.
या पैकी लोकरवाडी येथे अंगणवाडी क्र.१ येथे अंगणवाडीच्या परिसरात सगळ गवत व चीखलमय परिसरातच तिरंगा ध्वज लावल्याअसल्याने सदर गावातील नागरिक
या अंगणवाडीतील कर्मचारी व अधिकारी यांच्यावर योग्य ते कार्यवाही करावी अशी मागणी करत आहे. तिरंगा ध्वज हा देशाचे शान,अभिमान आहे.
आणि या ठिकाणी आपण तिरंगा ध्वजच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायलाच पाहिजे आणि हे तर अंगणवाडीच्या परिसरात जर का अश्या प्रकारे परिसर स्वच्छ ठेवत नसेल तर एक प्रकारे तिरंगा ध्वजाचा अवमाणच आहे असे संतप्त नागरिकांचे म्हणणे आहे.
एवढेच नव्हे तर आज दोन आधीच वर्ष झाले आज प्रयंत अंगणवाडी खुली करून कोणताच बाळाला खाऊ देत नाही.
काही नागरिकांनी अंगणवाडीतील कर्मचारीना कळविले असता दीड दोन महिन्यांनी आपल्या घरातून महिण्या भराचे खाऊ घेऊन जावा असे उद्धट शब्दात बोलतात असे नागरिक सांगत आहे. जर का अंगणवाडी परिसरच स्वच्छ नसेल तर आमच्या लेखराबालांना कोणती सुविधा देत असेल यांच्यावरून तुम्ही विचार करू शकता.
याच्या पलीकडे संगाचे म्हटल्यावर या दोन तीन वर्षात अंगणवाडी खुली करून आमच्या बाळाला अंगणवाडीतील खाऊ दिला असेल तर सांगा त्या व्यक्तींना आम्ही बक्षीस देऊ.
आता सर्व शाळा सुरू आहेत आणि सर्व शासकीय व सार्वजनिक ठिकाण पण शासनाने खुले केले आहे मग अंगणवाडी का खुलत नाही.