Ticker

6/recent/ticker-posts

माहूर मधील पहिली ते चौथीच्या शाळेत एकच शिक्षक, विद्यार्थ्यांचं होतंय शैक्षणिक नुकसान,


माहूर मधील पहिली ते चौथीच्या शाळेत एकच शिक्षक,  
  विद्यार्थ्यांचं होतंय शैक्षणिक नुकसान,
  
एकीकडे शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी शासन स्तरावर मोठे प्रयत्न होत आहेत तर दुसरीकडे जिल्हा परिषद शाळामध्ये शिक्षक नसल्याने मुलांच्या शिक्षणात अडथळा येत असल्याचे पहायला मिळत आहे. 

शासन शिक्षणावर लाखो रुपये खर्च करते. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.


माहूर: एकीकडे शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी शासन स्तरावर मोठे प्रयत्न होत आहेत. तर दुसरीकडे जिल्हा परिषद शाळामध्ये शिक्षक नसल्याने मुलांच्या शिक्षणात अडथळा येत असल्याचे पहायला मिळत आहे.

 शिक्षण हे वाघिणीचं दूध ते पिल्यावर सगळेजण गुरगुरतात,

 असे म्हटले जाते. मात्र, विद्यार्थ्यांना जर शिक्षणच मिळत नसेल तर याला म्हणावा तरी काय असा प्रकार माहूर तालुक्यातील नवी आबादी उर्दू शाळा माहूर येथील जिल्हा परिषदच्या शाळेत सुरू आहे. 

या जिल्हा परिषद शाळेत ६५ पेक्षा अधिक विद्यार्थी आणि शिक्षक मात्र एकच आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप माहूर एमआयएम पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष शेख सिराज रज़ा करीत आहेत.

एकीकडे शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी शासन स्तरावर मोठे प्रयत्न होत आहेत तर दुसरीकडे जिल्हा परिषद शाळामध्ये शिक्षक नसल्याने मुलांच्या शिक्षणात अडथळा येत असल्याचे पहायला मिळत आहे. शासन शिक्षणावर लाखो रुपये खर्च करते. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

नवी आबादी उर्दू शाळा माहूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ६५ च्यावर विद्यार्थी असून तिन वर्षा पासून शिक्षक मात्र एकच असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान होत आहे.

माहूर तालुक्यातील वार्ड क्रमांक १७ येथे जिल्हा परिषदेची शाळा असून ही शाळा पहिली ते चौथीपर्यंत आहे. शाळेत ७९ विद्यार्थी असून गेली तीन वर्षापासून शिक्षक मात्र, 

केवळ एकच असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे एकीकडे कोरोना काळात ऑनलाईन अभ्यासामुळे उर्दू विषय काहीही विद्यार्थ्यांना कळत नव्हता आणि आता शाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांच्या पालक मंडळीमध्ये चिंतेचा विषय बनला आहे 

माहूर हा मागास अतिशय आदिवासी नक्षलग्रस्त तालुका असल्यामुळे विशेष प्राधान्य देवून ही जागा भरण्यात यावी माहूर एमआयएम पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष शेख सिराज रज़ा यांनी दि.२९ रोजी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, व शिक्षणअधिकारी जिल्हा परिषद नांदेड 

यांना निवेदन देण्यात आले व १५ दिवसात  एक शिक्षक नेमणूक करावी अन्यथा आपल्या कार्यालयासमोर विद्यार्थ्यांसह उपोषण करण्यात येईल असा इशारा माहूर एमआयएम पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष सिराज रज़ा यांनी दिला आहे.