Ticker

6/recent/ticker-posts

पंधरा दिवसाच्या आत रोडचे काम केले नाही तर शिवसेना युवासेना आपल्या स्टाईलने उत्तर देणार युवा सेना यश खराटेसचिन जाधव दैनिक सायरन सारखणी दि ३०किनवट तालुक्यातील सारखणी ते तालाईगुडा राज्य मार्ग हा तेलंगाना राज्याकडे जाणारा हा रस्ता रहदारीसाठी सुलभ झाल्याने

शिवसेना युवा सेनाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन संपन्न

पंधरा दिवसाच्या आत रोडचे काम केले नाही तर शिवसेना युवासेना आपल्या  स्टाईलने उत्तर देणार युवा सेना यश खराटे

सचिन जाधव दैनिक सायरन सारखणी दि ३०

किनवट तालुक्यातील सारखणी ते तालाईगुडा राज्य मार्ग हा तेलंगाना राज्याकडे जाणारा हा रस्ता  रहदारीसाठी सुलभ झाल्याने


या मार्गावर मोठी वाहनाचे वरणदळ वाढल्याने या मार्गावर मोठे खड्डे पडल्याने लहान मोठे अपघात होत आहे आता सन उत्सव असल्याने मोठी रहदारी वाढणार असल्याने वाहनाचा अपघात होवू नय म्हणून शिवसेना युवासेना ऑटो युनियन तर्फे दिनांक 29 रोजी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते या
वेळी शिवसेना युवा सेनेचे नेते यश खराटे यांनी सार्वजनिक बांधकाम 


विभागांचा चांगलाच समाचार घेतला जिकडे तिकडे बेरोजगारी वाढली जनसामान्य जनतेला रोजगारासाठी भटकावे लागत आहे कामाच्या शोधात जाणाऱ्या येणाऱ्या प्रवासाच्या जीवनाशी खेळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असे खराटे म्हणाले 

याप्रसंगी उमरी सर्कल प्रमुख बजरंग वाडगुरे यांनी आपले मत मांडताना म्हणाले की सनावाराचे दिवस आहे ग्रामीण जनतेला वाहनाशिवाय प्रवासच नाही अशा रोडला मोठमोठे खड्डे पडले आहे अनेक वेळा तक्रारी करू नये अधिकारी झोपा काढायचे सोंग घेतात 

त्यांना धडा शिकवायला लागेल असे म्हणाले यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता रवींद्र उमाळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांना युवा सेना चे वतीने निवेदन देण्यात आले

 म्हणाले की सारखणी ते आंध्रप्रदेश हद्दीपर्यंत पूर्ण खड्डे पंधरा दिवसाचे आत दुरुस्त करून वाहनांना चांगला रोड देणार असे आश्वासन दिल्याने शिवसेना युवासेना व ऑटो युनियन चे आंदोलन आश्वासनामुळे थांबण्यात आले हे आंदोलन 29 ऑगस्ट रोजी सारखणी उमरी बाजार रोडवर रास्ता रोको करण्यात आला होता 

याप्रसंगी शिवसेना युवासेना ऑटो युनियनचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आले होते यावेळी सर्कल प्रमुख बजरंग वाडगुरे निलेश चव्हाण प्रभाकर संजय  अरुण आधी अशांत कार्यकर्ते सह  सिंदखेड पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके

 यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता याप्रसंगी एक तास वाहतूक ठप्प होते येणाऱ्या जाणाऱ्या प्रवासांचे तारांबळ उडाले होते