Ticker

6/recent/ticker-posts

नांदेड : राज्यभरात टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परिक्षा घोटाळा चांगलाच गाजत आहे. किनवट चे एक नाव आहे


नांदेड : राज्यभरात टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परिक्षा घोटाळा चांगलाच गाजत आहे. किनवट चे एक नाव आहे

चौकशी आणि प्रशासकीय कारवाईअंती अपात्र ठरलेल्या शिक्षकांचे वेतन हे आॅगस्ट महिन्यापासून बंद करण्याचे आदेश शिक्षण संचालक कार्यालयाकडून प्राप्त झाले असून, संबंधीत शिक्षकांसोबतच संस्थाचालकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत

२०१९ मध्ये घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेमध्ये सात हजार ८७४ उमेदवारांनी गैरप्रकारे परीक्षा उत्तीर्ण केल्याची माहिती समोर आली आहे. 

या घोटाळ्यात नांदेड जिल्ह्यातील प्राथमिकचे ५४ तर माध्यमिकचे २२ शिक्षकांचा समावेश आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या २०१९-२० मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल ता. १९ जानेवारी २०२० ला जाहीर झाला होता. 

या परीक्षेला १६ हजार ५९२ उमेदवार पात्र ठरवण्यात आले होते. त्यातील सात हजार आठशे उमेदवार अपात्र असताना त्यांच्याकडून हजारो रुपये घेऊन त्यांना पात्र ठरवण्यात आल्याचा आरोप आहे.

 त्यामुळे यात ४० ते ५० कोटींहून अधिक रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची चर्चा होत आहे. याची चौकशी पुणे सायबर पोलिसांद्वारे करण्यात आली.

दरम्यान, राज्य शासनाने ता. १३ फेब्रुवारी २०१३ नंतर अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये पाचवी ते आठवीपर्यंत रुजू शिक्षकांचे मूळ टीईटी उत्तीर्ण प्रमाणपत्रांच्या पडताळणीचा निर्णय घेतला होता.

 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अध्यक्षांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देत प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते.

 त्यानुसार शिक्षण विभागाने प्रमाणपत्र जमा करण्याची प्रक्रिया राबविली.

 त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील प्राथमिकचे ९७ तर माध्यमिकचे १२ प्रमाणपत्र पडताळणीसाठी पाठविले होते. 

दहा प्रमाणपत्रे बोर्डाकडेच होते. यापैकी प्राथमिकचे ५४ तर माध्यमिकचे २२ प्रमाणपत्रे पडताळणीमध्ये बोगस ठरविण्यात आली असून, या सर्व बोगस शिक्षकांचे आॅगस्ट महिन्यापासूनचे वेतन थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आॅगस्टपासून वेतन रोखण्याचे आदेश

टीईटीतील गैरव्यवहार व त्याअनुषंगाने कार्यवाहीबाबत शिक्षण संचालकांनी शिक्षणाधिकारी, वेतन पथक अधीक्षकांना आदेश पाठवला आहे.

 अपात्र उमेदवारांचे शालार्थ आयडी गोठवण्यात आले असून त्यांना आॅगस्ट २०२२ पासून आॅनलाईन अथवा आॅफलाईन वेतन अदा होणार नाही, याची दक्षता घ्यावी असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

तसेच त्यांना वेतन अदा झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

संस्थाचालक झाले हैराण

संस्थाचालकांनी आपल्या संस्थेमध्ये नातेवाईकांना बोगस टीईटी प्रमाणपत्रे देवून रुजु करून घेतले होते. परिणामी पात्र शिक्षकांवर अन्याय झाला होता. 

मात्र, टीईटी परीक्षेतील घोटाळे बाहेर आल्यानंतर संस्थाचालक चांगलेच हैराण झाले होते. आता तर, 

शिक्षण संचालकांनी बोगस शिक्षकांची नावेच समोर आणल्याने आणि त्यांचे वेतन थांबविण्याचे आदेश दिल्यामुळे संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहेत


वेतन बंद करण्यात आलेल्या सहशिक्षकांची नावे मोहम्मद फराज गुलाम मोहियोद्दीन, श्याम अरुणराव भोसले, ताराबाई किशन कक रे, संगीता निक्रकंठराव सुभेदार, सय्यद साजिद हुसेन, 

शेख अहेमद पाशा शेख नबी, किनवट लेट अली उर्दू स्कूल प्राइमरी 

गंगाराम अविनाश पानपड्े, दैवशाला भारतराव ककसकर , पवन मारोतराव मानेकर, स्नेहल रमाकांतराव परकंठे, वसंत गोविंदराव कंधारे, रणजित व्यंकटराव डांगे, विद्ठल दगडोबा चव्हाण, 

राहुल वसंतराव दूमणे , समरीन बेगम शेख युसुफ, आयेशा परविन अचल सत्तार , महेनाज इराम अजिज सिद्दीकी, नाझिया बेगम अशफाक हुसेन, 

फौजिया अफजल अहेमद खान, मतिन खानम, श्रीधर नामदेव पवार, मेराज फतिमा चाऊस, मोहम्मद तस्लिम मोहम्मद इब्राहिम, शेख हिना एम.रफी, सरिा सुभाव वन्नाढे, राहुल गोमाजी पवार, अविनाश नागोराव कंधारे, सय्यद 

हाश्मी सय्यद युसुफ अली, अब्दुल्ला साऊद बशिरुझम्मा, अब्दुल रब अब्दुल्ल 

हबीब, अब्बासी मोहम्मद झुबेर, नेहा अफरिन मोहम्मद अफ्सर,, सोबिया नाझिन महम्मद रफीरोद्दीन, अम्मारा मरीयम बशिरुझम्मा, मोहम्मद इस्लाम अब्दुल रझाक, महविन फातिमा मिर्झा कलिम बाग, सुमय्या फिरदोस शेख अहेमद, मोहम्मद हाजी मोहम्मद फारुक, 

मयुरी गणपतगौड सुदानवार, फौजिया कौसर मोहम्मद हबीब, माजिद खान हमिद खान, अब्दूल माजिदअली जावेद अब्दूल मुजीब, मोहम्मद जाविद अब्युल मद, | 

ईराम अफरान, खालेद गौस मोहियोह्दीन काझी वसील सुलतान मुख्तार , मोहम्मद याकुब मोहम्मद इब्राहिम, अतिकौर रहेमान मक्कीत अहमद, गंगाराम तुकाराम बस्वदे, राज्षिया अन्युम समिर खान, अब्दुल माजिद अब्दुल गणी, मोहम्मद सलिम,