गावठाण हद्दीतील दस्त नोंदणी पुर्ववत चालू करण्यात यावी ___ विनोद पवार
बाळकडू : विनोद पवार
संपर्क : ८४८४८४३७७९
०८३ किनवट ( नांदेड ) गावठाण मधील मोकळी जागा विक्री होत असताना मालकी नोंद प्रमाणपत्र तसेच गावठाण मधील मोकळी जागा असे प्रमाणपत्र पुर्वी प्रमाणे देण्यात यावे.
ग्रामपंचायत गावठाण हद्दीतील व नवीन विस्तार वाढीच्या मालमत्तेचे प्रमाणपत्र वेळेत उपलब्ध होत नसल्याने मालमत्ता कवडीमोल विकण्याची वेळ प्लांट धारकांना आली आहे.
कोरोना महामारी मुळे , अतिवृष्टीमुळे, सततच्या नापिकीमुळे, पैशांच्या अभावामुळे, दवाखान्याच्या खर्च , अशा प्रकारे विविध कारणास्तव प्लांट धारकांना विक्री केल्याशिवाय पर्याय नाही.
प्रमाणपत्रे, व दस्त नोंदणीसाठी लागणारे सर्व कागदपत्रे देण्यात यावे असा आदेश तालुक्यातील ग्रामपंचायतींना देण्यात यावे अशी विनंती पंचायत समिती कार्यालय किनवट यांना खेडे, गाव विकास संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष विनोद पवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.