Ticker

6/recent/ticker-posts

*इकोनेट संस्था, पुणे यांच्या जैव उर्जा प्रकल्पा अंतर्गत महिला सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन*किनवट


*इकोनेट संस्था, पुणे यांच्या जैव उर्जा प्रकल्पा अंतर्गत महिला सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन*

किनवट ता. प्र. 🖊️ मारोती देवकते

सांस्कृतिक भवन मांडवी येथे इकोनेट संस्था, पुणे यांच्या जैव उर्जा प्रकल्पा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांतर्गत महिला सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमा अंतर्गत महिलांना गटबांधनी, कायद्याची माहिती,  शेंदरिय शेती, परसबाग, 

वन भाज्या, वृक्ष लागवड, जंगल संवर्धन, सुधारित चुल, रोपवाटीका विकासान, हवामान बदलाचे कारण व होणारे परिणाम, पेसा कायदा, 

वन हक्क,एकल महिलांचे संघटन, सामुहिक वन हक्क, रोजगार हमी योजना, पर्यावरण संवर्धन, स्वरक्षण जन जागृती उपक्रम, 

तसेच शेतकरी महिला गट, ग्रामसभेत महिलांचा सहभाग ,महिला ग्रामसभा, गाव विकासासाठी महिलांचा सहभाग, 

असे विविध योजनाची माहिती महिंलाना व्हावी व महिलांना आपल्या हक्काची माहिती व्हावी यासाठी म्हणुन  हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता 

कार्यक्रमाच्या सुरवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली 

त्या वेळी या कार्यक्रमा मध्ये नवरगाव, दुध गोंडखेडी(दरसांगवी सि.), 

पाटोदा, डोंगरगाव, जरूर, जरूर खेडी, येथील महिलांनी व शेतकर्यांनी उपस्थिती दर्शवली.
त्या वेळी सूत्रसंचालन दत्ता वाघाडे, इकोनेट पुणे यांनी केले व

मुख्य मार्गदर्शक:- जितेंद्र कठाळे ( इकोनेट संस्था पुणे), प्रस्तावीक - अमित कुलकर्णी,इकोनेट पुणे  अध्यक्षस्थानी:- विठ्ठल मुपकलवार, कृषी सहायक 
तसेच प्रमुख पाहुणे म्हणून:- ईश्वर आडे, 

श्रीनिवास दार्लावार, ( उमेद प.सं. किनवट), मनिषा मडावी/ ग्रामसखी ( एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट), आभार अनिता गुर्नुले.