तरुणांनी आम आदमी पक्षात प्रवेश करून देशाचे नेतृत्व करावे
किनवट प्रतिनिधी* राज्यात होणाऱ्या आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने विविध पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी आपापल्या गट व गणात जनतेसोबत भेटी गाठी सुरू केले असून
आता किनवट माहूर तालुक्यातील ग्रामीण भागातिल तरूणांनी भ्रष्टाचार मुक्त भारत देश घडविण्यासाठी आम आदमी पार्टी पक्षात प्रवेश करून देशाची राजधानी दिल्ली चे मुख्यमंत्री मा.अरविंद केजरीवाल यांचे हात बळकट करून आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर कदम
यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या निवडणुकीत संधी प्राप्त करण्यासाठी किनवट माहूर तालुका आम आदमी पार्टीचे अध्यक्ष भाऊसिंग राठोड व तालुका सचिव शेख समद उर्फ हाजी भाई यांनी आव्हान केले आहे.
भारतीय राजकारणात, समाजातून होणारा तरुण नेतृत्वाला मिळणारा पाठिंबा हा प्रस्थापित राजकारण्याच्या उरात धडकी भरवणारा आहे.
प्रस्थापित राजकारण्यांच्या संधीसाधू राजकारणाला जनता कंटाळली आहे.
तर नव्याने उदयास येणाऱ्या तरुण नेतृत्वात त्यांना सशक्त पर्याय दिसत आहे. राजकारणात असणारी प्रस्थापितांची घराणेशाही या तरुण नेतृत्वामुळे मोडीत निघेल.
व्यवस्थेमधील असणारी कमी हे तरुण जनतेच्या लक्षात आणून देत आहेत. म्हणूनच त्यांना समाजाचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.
त्यांचा आवाज राज्यापुरताच मर्यादित न राहता दिल्लीपर्यंत पोहोचत आहे.त्यामुळे येणारा काळ हा या तरुण नेतृत्वासाठी सुवर्णकाळ असेल.
करिता राजकारणातून देशाची दशा आणि दिशा बदलण्याचे भाग्य व देशात भ्रष्टाचार मुक्ती चे साक्षीदार होण्यासाठी तरुणांना लाभले असून आगामी काळात देशाचं नेतृत्व युवा व तरुण पिढीच्या हातात आहे.करीता निर्व्यसनी,सुसंस्कारी
देशभक्त तरुणांनानी आम आदमी पार्टी हे भ्रष्टाचाराला आळा घालण्याकरिता समाजकारणाच्या माध्यमातून राजकारण करण्यासाठी संधी चे सोने करण्यासाठी
किनवट माहूर तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत संधी प्राप्त करण्यासाठी युवकांनी आम आदमी पार्टी मध्ये सामील व्हावे