Ticker

6/recent/ticker-posts

किनवट : शिक्षण विभाग पंचायत समिती, किनवट व महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गोकुंदा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा, राष्ट्रीय विज्ञान नाट्योस्तव 2022 उत्साहात संपन्न झाले

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचे "लसीकरण कथा" नाट्य तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात प्रथम

किनवट : शिक्षण विभाग पंचायत समिती, किनवट व महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गोकुंदा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा, राष्ट्रीय विज्ञान नाट्योस्तव 2022 उत्साहात संपन्न झाले.
       
यावेळी अध्यक्ष म्हणून प्राचार्य शेख हैदर , उद्घाटक  केंद्र प्रमुख रमेश राठोड, मानव विकास समन्वयक उत्तम कानिंदे, उप मुख्याध्यापक जुम्माखान पठाण, प्राचार्या नालंदा कांबळे हे प्रमुख अतिथी उपस्थित होते.


अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा मध्ये समीर विश्वास पाटील (अशोक पब्लीक स्कूल, पळशी ) याने प्रथम , तनुजा तुकाराम जाधव (महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय , गोकुंदा हिने द्वितीय व ओमसाई मोदुकवार (मातोश्री कमलताई ठमके माध्यमिक विद्यालय , सुभाषनगर , किनवट याने तृतीय क्रमांक पटकाविला.
    
     राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव 2022 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, गोकुंदाच्या " लसीकरण कथा " या नाटयाने प्रथम क्रमांक पटकाविला. यात अंबादास जुनगरे व सतिश विणकरे यांच्या मार्गदर्शना खाली संदीप मरडे , रूपेश राठोड , सच्चितानंद गिते , पल्लवी तेलंग , प्रीती दुधमल , नंदिनी दुधमल , साईनाथ आडे , दुर्गा मादसवाड यांनी सहभाग घेतला होता.
     

 अशोक पब्लिक स्कूल (इंग्लिश मेडियम), पळशी चमुने दुसरा क्रमांक पटकाविला. यात काजल राठोड , वैष्णवी आडे , पवन राठोड यांच्या मार्गदर्शना खाली विधीता पवार , ग्रीषा सिरमनवार , मनीषा चिप्पुलवार , ऋतिक पवार , समीर पाटील व ध्वनी आडे यांनी सहभाग घेतला होता.
  

   श्रीमती शोभना लक्ष्मण नाईक प्राथमिक आश्रम शाळा , पळशीतांडा चमूने तृतीत क्रमांक पटकाविला. यात विश्वास पाटील व यू. जे. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नपूर्णा आडे , समीक्षा कोटरंगे व सुमीत गुरनुले यांनी सहभाग घेतला होता.
    

  सुरेंद्र पाटील व प्रज्ञा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. अंजली हलवले यांनी आभार मानले. या स्पर्धेसाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यापक रघुनाथ इंगळे , विनोद कांबळे, संजय ढाले यांनी परिक्षक म्हणून यशस्वी भूमिका पार पाडली. 
   
   कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पर्यवेक्षक प्रमोद मुनेश्वर , प्रशांत डवरे , जी. के. श्रीमंगल , मनोज भोयर , विकास गवळे , गजानन भगत , सतीष विणकरे , श्याम जायभाये , संदेश भरणे , ज्ञानेश्वर कदम , खांडरे व देवतळे यांनी परिश्रम घेतले..