यशस्वी सापळा कार्यवाही
➡ *युनिट :-* लातूर
➡ *तक्रारदार :-* पुरुष, वय 48 वर्षे
➡ *आरोपी :
रेणुका बालाजी जाधव, वय 31 वर्षे, पोलीस उप निरीक्षक (वर्ग-2), नेमणूक - रेणापूर पोलीस स्टेशन, लातूर
➡ *तक्रार प्राप्त:-*
दि.04/09/2022
➡ *लाच मागणी पडताळणी:-*
दि.05/09/2022
➡ *लाच स्विकारली:-*
दि.05/09/2022
➡ *लाचेची मागणी रक्कम:-* सुरुवातीस 7,000/- रु.
तडजोडी अंती 5,000/- रु.
➡ *स्विकारली रक्कम :-*
5,000/- रु.
➡ *हस्तगत रक्कम:-*
5,000/- रु.
➡ थोडक्यात हकीकत
यातील आरोपी लोकसेविका महिला पोलीस उपनिरीक्षक रेणुका जाधव यांनी तक्रारदार यांना त्यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये फिर्यादीच्या बाजूने तपास करून मा. कोर्टात पाठविण्यात आलेल्या दोषारोपपत्राचा मोबदला तसेच
यानंतर दाखल गुन्ह्यातील आरोपी यांचे कडून भविष्यात संरक्षण देणेकामी त्यांचे रहातेघरी बोलवून सुरुवातीस 7,000/- रु ची व तडजोडी अंती 5,000/- रु ची पंचासमक्ष लाचेची मागणी केली.
त्यानंतर थोड्याच वेळात आलोसे यांनी लाच मागणी केलेली रक्कम 5,000/- रु रेणापूर बस स्टँड अवारात पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडून स्विकारली. त्यांना जागेवरच सापळा रक्कमेसह रंगेहाथ पकडण्यात आले. गुन्हा दाखल करण्याची पुढील प्रक्रिया चालू आहे.
➡ *मार्गदर्शक:-*
डॉ. राजकुमार शिंदे ,
पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नांदेड परिक्षेत्र, नांदेड
श्री. धरमसिंग चव्हाण,
अपर पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि.नांदेड परिक्षेत्र, नांदेड.
➡ *पर्यवेक्षण अधिकारी:-*
पंडीत रेजितवाड ,पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि.लातूर
➡ *सापळा अधिकारी:-*
अन्वर मुजावर, पोलीस निरीक्षक व ला.प्र.वि. लातूर टीम
➡ *तपास अधिकारी:-*
अन्वर मुजावर, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. लातूर
*लातूर जिल्ह्यातील सर्व नागरीकांना अवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा
त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.*
डॉ. राजकुमार शिंदे , पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नांदेड परिक्षेत्र, नांदेड
मोबाईल नंबर - 09623999944
पंडीत रेजितवाड, पोलिस उप अधीक्षक, ला.प्र.वि. लातुर
मोबाईल नंबर - 09309348184
ला.प्र.वि.लातूर कार्यालय दुरध्वनी - 02382242674