किनवट येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांचे नामनिर्देश विभागात दुर्लक्ष
किनवट:
माहे जानेवारी 2021 ते मे 2022 या कालावधीत मुदत संपलेल्या व जून 2022 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती च्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुका करिता संगणक प्रणाली द्वारे नामनिर्देश पत्र मागविण्यात येत आहेत
राज्य निवडूक विभागांतर्गत होत असलेल्या किनवट तालुक्यांतील 47 ग्रामपंचयती साठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून नामनिर्देशन पत्र भरण्यास 24 ऑगस्ट 2022 रोजी पासुन सुरवात झाली असून शेवटची तारीख 1 सप्टेंबर 2022 ही आहे
सदरील नामनिर्देशन पत्राची छाननी 2 सप्टेंबर रोजी तर नामनिर्देशन पत्रे परत घेण्याची शेवटची तारीख 6 सप्टेंबर ठेवण्यात आली
सदरील नामनिर्देशन पत्रावर 18 सप्टेंबर रोजी सकाळी 7.30 पासुन ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान करता येईल असे निवडणुक विभागाकडून सांगण्यात आले.
परंतू किनवट येथील नामनिर्देशन पत्र दाखल करून घेत असलेल्या सभागृहात अर्जदार ऐवजीं इतर प्यानल प्रमुख आणि त्यांचे सहकारी त्यांची अफाट गर्दी दिसून येत आहे यामुळे निवडणुक विभागांच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामात अडथळा सुद्धा येत असल्याचे दिसून येत आहे
अर्जदाराच्या व्यतिरिक्त इतर पॅनल प्रमुख आणि त्यांचे सहकारी यांची गर्दी कमी करुण नामनिर्देशन पत्रे दाखल करून घेत असलेल्या सभागृहात अर्जदारा व्यतिरिक्त इतर लोकांना प्रवेश देण्यात येऊ नये अशी मागणी जण सामन्यातून तसेच काही अर्जदार यांच्या कडून होत आहे