Ticker

6/recent/ticker-posts

गोकुंदा ग्रामपंचायतीत प्रतिनिधी म्हणून पाठवलेलेच मालक होऊन विकासाची वाट लावली. पुन्हा पश्चाताप नको, सावध व्हा!


गोकुंदा ग्रामपंचायतीत प्रतिनिधी म्हणून पाठवलेलेच मालक होऊन विकासाची वाट लावली. पुन्हा पश्चाताप नको, सावध व्हा!

*सुजान आणि परिवर्तनवादी मतदार बन्धू आणि भगिनींना नम्र आवाहन करण्यात येते की, पुन्हा पाच वर्ष पश्चाताप करण्यापेक्षा आजच ग्रामपंचायतीमध्ये  विश्वासार्हता असलेल्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना शहराचे उत्तमोत्तम प्रतिनिधीत्व करण्यासाठी सभागृहात पाऊया.*

       
आजपर्यंत ग्रामपंचायतीत प्रतिनिधीत्व करणार्‍यांनी याही निवडणुकीत उमेदवार म्हणून पुढे आले आहेत. मतं मागण्यासाठी तुमच्याकडे आल्यास पाच वर्षात केलेल्या कामाची विचारणा करा. 

चौदावा व पंधरावा वित्त आयोगाचा निधी, पेसा अंतर्गतचा निधी, दलीत वस्ती सुधार योजना, तांडावस्ती सुधार योजना, जिल्हा ग्रामिण विकास निधी, 

अशा विविध स्वरुपाचा विकास निधी वर्षाअखेर किती आला ? कोणत्या प्रभागात कोणत्या कामावर खर्ची लावला ? याचे स्पष्टकरण घ्या.
      

 नोंदनीकृत सोळा हजारावर लोकसंख्या असलीतरी प्रत्यक्षात मात्र अधिक लोखसंख्या आहे. आज गल्लोगल्ली पथदिव्ये पोहोचले नाहीत. * पक्की रस्ते नाहीत. 

अनेक गुत्तेदारांनी बाहेरचा विकासनिधी आणून गोकुंद्यात ओबडधोबड कामे केलीत मग ग्रामपंचायतीचा निधी कुठे गेला ? पक्या नाल्यांचा अभाव असल्याने घानीने उच्चांक तर गाठलाच शिवाय त्याचा दुष्परीणाम लोकांच्या आरोग्यावर झेलावा लागला. 

* आदिवासी वस्त्यांमध्ये पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी "आरो प्लाँट" (जल शुद्धीकरण यंत्र) आले परंतू ते पंचायतमध्ये धूळखात पडून आहेत.

 त्यावर केलेला खर्च अनाठायी केला याचा जाब विचारायला पाहिजे. समर्पक उत्तर देत नसतील तर त्यांची जागा त्यांना दाखवा. प्रतिनिधी म्हणून पाठवले मात्र मालक होऊन आपल्याच विकास निधीवर डल्ला मारणार्‍यांना संधी मिळणार नाही याबद्धत सावध व्हा, कारण रात्र वैर्‍याची म्हणतात.
      

   गायरान जमिन, कृषीक जमिनीवरील अवैध प्लाॅटींगला मान्यता देणे, गाव पांदनरस्ता, पंचायतीच्या मालकी भूखंडासह आयटीआयला लागून असलेला ५ गुंठे स्मशानभूमीची जागा ज्यांनी विकली तेच आज पुन्हा तुमच्याकडे ताठ मानेने मतं मागायला येत आहेत. 

गावठाण हद्दीत येत नसतांना गावठाण प्रमाणपत्र देऊन लोकांसह शासनाची फसवणूक करणार्‍यांच्या आमिष्याला, भूलथापांना, दडपशाहीला आता बळी पडाल तर त्याचा पुन्हा पाचवर्ष पश्चातापच करावा लागेल. 
      म्हणून मतदार बन्धू-भगिनींनो नव्या होतकरुंना नेतृत्वाची आपण सर्व मिळून संधी देऊयात. धन्यवाद!