Ticker

6/recent/ticker-posts

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या.. या घोषणे सह किनवट येथील गणरायाला भक्तीभावाने निरोप देण्यात आला.या मध्ये विविध गणेश मंडळाचे गणपतीचे विसर्जण करण्यात आले आंचार संहीतामुळे या वेळी डीजेला परवानगी नसल्याने ढोल ताशाच्या गजरात मिरवणुक काढण्यात आली होती


गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या.. या घोषणे सह किनवट येथील गणरायाला भक्तीभावाने निरोप देण्यात आला.
या मध्ये विविध गणेश मंडळाचे गणपतीचे विसर्जण करण्यात आले आंचार संहीतामुळे या वेळी डीजेला परवानगी नसल्याने ढोल ताशाच्या गजरात मिरवणुक काढण्यात आली होती .

या वेळी नगर परीषद प्रशासना तर्फे पैनंगंगा नदी काठी गंगापुत्र जीवन रक्षक दलाची व्यवस्था करण्यात आली

या प्रसंगी प्रभारी मुख्याधिकारी तथा तहसिलदार डॉ.मृणाल जाधव, उपविभागिय पोलिस अधिकारी विजय डोंगरे, पो.नि. अभिमन्यु साळुंके, पो. उ. नि. विनायक पवार आदींनी पाहणी विसर्जन ठिकाणच्या परीसराची पाहणी  केली

 या दरम्यान पवार स्वामी तर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या वेळी व्यापारी असोसिएशनच्या व्यांपाऱ्यांनी महाप्रसाद वाटप करण्यास सहाय केले.

या वेळी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार,नप उपाध्यक्ष गोपाल व्यंकट नेमानिवार,अजय चाडावार, माजी नप उपाध्यक्ष श्रीनिवास नेमानिवार , परीषद स्वच्छता निरीक्षक चंद्रकांत दुधारे, कॉंग्रेस प्रवक्ते गिरीश नेमानिवार, 

माजी नगराध्यक्ष साजीद खान, शिवा कॅतमवार, सर्व नगर सेवक, नगर परिषद कर्मचारी, सफाईगार, आदी जन उपस्थित होते, पोलिस प्रशसाना तर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता