किनवट तालुका प्रतिनिधी : साहित्य् सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची दखल घेत विदेशातील रशिया येथे त्यांच्या पुतळा उभारणे म्हणजे त्यांच्या कार्याचा यथोचीत गौरव असून ही समस्त् देशवासीयांसाठी भुषणावह बाब आहे.
अशी प्रतिक्रीया मातंग समाजाचे नेते तथा माजी नगराध्यक्ष के.मुर्ती यांनी व्यक्त् केले.
अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर डाव्या विचारसरणीचा पगडा होता. रशियामध्ये लेनिनने केलेल्या कामगारांच्या क्रांतीने ते भारावले होते. तशाच पध्दतीची क्रांती ते भारतात आणण्यासाठी उत्सुक होते. त्यामुळे त्यांच्या साहित्यामध्ये कामगार, दलित आणि उपेक्षीत लोकांना केंद्रस्थान होते.
साहित्यात स्टॉलिनग्राडचा पोवाडा, माझा रशियाचा प्रवास आणी रशियन भाषेत भाषातंरीत झालेल्या अनेक कथा आणि कादंबऱ्यांचा समावेश होता.
म्हणून अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची दखल घेत रशियामध्ये त्यांच्या वास्तव् लक्षात घेवून तेथील शासनाने अण्णाभाऊ साठे
यांचा पुतळा रशियात उभारला या पुतळयाचे लोकार्पण बुधवारी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र् फडणवीस
यांच्याहस्ते विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्यासह अन्य् मान्य् वरांच्या उपस्थितीत पार पडला. अण्णाभाऊंचा पुतळा उभारण्यासाठी मुंबई विद्यापीठातील संबंधीत तसेच रशिया सरकार व रशियातील अण्णाभाऊ साठेंचे अभ्यासक, चाहते यांनी प्रयत्न् केले.
केवळ पुतळाच नाही तर अण्णाभाऊच्या भावी पिढीला ओळख व्हावी यासाठी अभ्यास मंडळांचे ही लोकार्पण करण्यात आले.
मॉस्कोत जगविख्यात व्यक्तींचे पुतळे बसविण्यात आले असून त्यामध्ये आता लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा समावेश झालेला आहे. ही बाब अत्यंत आनंददायी आहे.