Ticker

6/recent/ticker-posts

किनवट येथील सरस्वती विद्या मंदिर महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत मराठवाडा मुक्ति संग्राम दिनी स्वातंत्र्य सैनिकांच्या परिवारातील सदस्यांचा प्राचार्य डॉ आनंद भंडारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

   17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती   चे यावर्षी 75 वर्षे पूर्ण होत असून आझादी का अमृत महोत्सव निमित्त यावर्षी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सरस्वती महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा 

योजनेच्या वतीने झेंडावंदना नंतर मराठवाडा मुक्ती करिता आपले सर्वस्व पणाला लावणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करण्याचा मानस

 शिक्षण  संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव नेमानीवार व प्राचार्यांनी केला यानिमित्त दिवंगत स्वातंत्र्य सैनिक डॉक्टर आनंदराव गड्डमवार यांच्या पत्नी श्रीमती अरुणाबाई आनंदराव गड्डमवार 

या नव्वदी पार केलेल्या आजींचा  त्याचबरोबर वाटूर तालुका परतुर जिल्हा जालना येथील स्वातंत्र्य सैनिक दिवंगत विठ्ठलराव वायाळ 

यांचे चिरंजीव प्रा द्वारकाप्रसाद वायाळ व सून सौ सुनीता द्वारकप्रसाद वायाळ रा किनवट यांचा यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला यावेळी डॉ विजय उपलंचवार , 

डॉ सुनील व्यवहारे, प्रा विवेक चनमनवार, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा अजय किटे डॉ रामकिशन चाटे, प्रा सुनील मिरासे यांची उपस्थिती होती.