किनवट शहर बनले मटक्याचे माहेर घर, पोलीस प्रशासनाचे झोपेचे सोंग
" प्रेस संपादक व पत्रकार संघातर्फे लवकरच पोलीस अधिक्षकांना निवेदन देण्यात येणार"
प्रतिनिधी किनवट:-
किनवट/ माहुरचे आमदार भीमराव केराम यांच्या जनसंपर्क कार्यलयाच्या परीसरातच तसेच
पोलिस उपविभागिय अधिकारी कार्यालया पासुन पन्नास पावलावर मटक्याचा खुलेआम बिनदिक्कतपणे बाजार सुरू आहे
यावर पोलीस प्रशासन झोपेच सोंग घेऊन मुक दर्शक बनुन सर्व खेळ बघत आहे .
सविस्तर वृत्त असे कि मागेच केवळ एक महिना मटका बंद राहीला नंतर जो मटक्याने जोर पकडला भाजी मार्केट, महात्मा फुले चौक, बस्थानक परीसर, रेल्वे स्टेशन , समता नगर,गोकुंदा, खरबी पाँईट, राम नगरसह घोटी, कमठाला , राजगड, अंबाडी, इंजेगाव, वाई बाजार
इत्यादी ठिकाणी कल्याण मटक्याचा अवैध बाजार सुरु आहे या मुळे हातावर काम करणारे रोज मजुरीवर जाणारे लोक सर्व पैसा मटक्यावर आकडा लावत आहे
व गरीब महीलांच्या चुली विझत आहे म्हणुन यावर वरीष्ठ पोलिस व मुख्यमंत्र्यानी लक्ष घालावे अशी मागणी सुजाण नागरीक करीत आहे.