Ticker

6/recent/ticker-posts

"किनवट ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसा अखेर ४७ ग्रामपंचायतीसाठी १९० अर्ज तर सदस्यांसाठी १ हजार ८५ अर्ज दाखल झाले आहेत


"किनवट ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसा अखेर ४७ ग्रामपंचायतीसाठी १९० अर्ज तर सदस्यांसाठी १ हजार ८५ अर्ज दाखल झाले आहेत 

आमडी,कनकी व राजगड येथे सरपंचपदासाठी केवळ एकच अर्ज आला आहे त्यामुळे तेथील सरपंच बिनविरोध निवडले आहेत 

 तर राजगड येथे सदस्य पदासाठी देखील केवळ सातच अर्ज आल्याने ती ग्रामपंचायत बिनविरोध निवडल्यात जमा आहे सक्रूनाईकतांडा येथे  एकही अर्ज दाखल न केल्याने त्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे  

 तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत असून १५२ प्रभागात ४१५ सदस्य निवडले जाणार आहे ४७ सरपंचाची थेट जनतेतून निवडणूक होणार आहे सदस्यांसाठी १ हजार ८५ अर्ज तर सरपंच पदासाठी १९० अर्ज दाखल झाले आहेत 

तालुक्यातील सक्रूनाईकतांडा ग्रामपंचायत अनुसूचित क्षेत्रात मोडत नसतांना व एसटी नसताना अनुसूचित क्षेत्रात असल्याने गावकऱ्यांनी बहिष्कार टाकला आहे

 ६ सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख असल्याने किती ग्रामपंचायतीत कोण कोणाची माघार असणार हे कळेल सध्यातरी निवडणूक रिंगणात 

सरपंचपदासाठी  १९० व सदस्यांसाठी  १ हजार ८५ असे १ हजार २७५ उमेदवार रिंगणात आहेत अशी माहिती निवडणूक सूत्रांनी दिली आहे "