Ticker

6/recent/ticker-posts

जुन्या ग्रामपंचायत सदस्याला गोकुंदा देणार दणका, प्रचलित पॅनलचाही उडणार धुवा


जुन्या ग्रामपंचायत सदस्याला गोकुंदा देणार दणका, प्रचलित पॅनलचाही उडणार धुवा.
किनवट प्रतिनिधी...


तालुक्यातील 47 ग्रामपंचायतीचा रणधुमाळीचा दिवसेंदिवस प्रभाव वाढत चालला असून तालुक्यातील सर्वात मोठी १७ सदस्य असलेली ग्रामपंचायत गोकुंदा ची निवडणूक अतिशय अटीतटीची होत 

असून यावेळेस शहरातील सुज्ञ व जागरूक जनता ही जुन्या ग्रामपंचायत सदस्याला नाकारून आणि नेहमीच्या प्रचलित पॅनलला झीडकारून नव्या जोमाने काम करणाऱ्या व्यक्तीला ग्रामपंचायत मध्ये सदस्य म्हणून पाठवण्याचा विजय निश्चय

 गोकुंदा येथील सर्वच वार्डातील जागरूक नागरिक व्यक्त करीत असून  नेहमीच्या त्याच त्या सदस्याला जनता कंटाळून गेली असल्याने नवा चेहरा विकासाचा मोहरा असा नवा सदस्य पाठवण्याचा संकल्प केला आहे.

 मागील सदस्याच्या कारभाराला जनता वैतागली असल्याचे ही बोलले जात आहे. 

माग च्या पाच वर्षाच्या काळात गोकुंदा शहरात कुठलीच विकासाची कामे झाली नाहीत, केवळ आपल्या स्वार्थी राजकारणा तुन अर्थकारणाशिवाय काही च साध्य केले नसल्याने जनता कमालीची उदासीन आहे. 

म्हणून मागील सदस्यांना झीडकारून नवे कामे वार्डात खेचून आणणाऱ्या सदस्यांना यावेळेस निवडून दिले जाईल असा आत्मविश्वास नागरिकांतून व्यक्त होत आहे. 

मागील सदस्या बरोबरच नेहमीच्या प्रचलित पॅनल ला सुद्धा दणका देण्याचा मनोदय सुशिक्षित आणि जागरूक जनतेतून बोलला जात असून हीच विकासाची नीती 

जिल्हा परिषद निवडणुकीत सुद्धा राबविली जाणार असल्याचे नागरिकांतून व्यक्त होताना दिसून येत आहे.