Ticker

6/recent/ticker-posts

तिसरे निवेदन लोकशाहि दिनी देऊनहि दिव्यांगाच्या शेतीवर अतिक्रमण करणाऱ्या दोषीवर कार्यवाहि होत नाहि नसेल ? तर दिव्यांग कायदा २०१६ कशासाठी? दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल*


तिसरे निवेदन लोकशाहि दिनी  देऊनहि दिव्यांगाच्या शेतीवर अतिक्रमण करणाऱ्या दोषीवर कार्यवाहि होत नाहि नसेल ? तर दिव्यांग कायदा २०१६ कशासाठी? दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल*

प्रतिनिधी,       
                                                                     
 नायगाव तालुक्यातील  कूंचेली हे गाव १९८३ ला मन्याढ नदी मुळे पुनर्वसन झाले.शासनाने नविन गावात तिन गुंठ्यांचे प्लाट,व घर बांधन्यासाठी साहित्य,व अनुदान दिले,व गावात सर्व सोई सवलती दिल्या व गावातील सर्व नागरिक आंनदाने नविन गावात राहात आहेत.
     दलित वस्तीतील बौधवाडा  येथील समाज ३९ वर्षाऩतर आमचे घर होते म्हणून कोणताहि नकाशा व पुरावा नसताना डोझर ने उकरून  बाजुच्या  शेतकऱ्यांची व दिव्यांगाच्या  जमीनत माती दगड टाकुन ताबा घेऊन पेरणी केली व शेतात झेंडा रोवला असल्यामुळे योग्य ते चौकशी करून न्याय मिळवा म्हणुन दिव्यांग बांधव व शेतकऱ्यानी तिन महिन्यापासुन संबधित तहसिलदार,गटविकास अधिकारी,सहपोलिस निरीक्षक यांच्याकडे विंनती अर्ज करुन न्याय मिळत नसल्यामुळे लोकशाहि दिन जनतेच्या तक्रारीची त्वरीत दखल घेतली जाईल म्हणुन दिव्यांगानी जुलै,ऑगस्ट,सप्टेबर असे तिन महिन्यापासुन लोकशाहि दिनी तक्रार करून सुध्दा दिव्यांगाना न्याय मिळत नसेल तर दिव्यांग कायदा २०१६ कशासाठी?व दिव्यांग कायद्यात दप्तर दिरंगाई कायदा फक्त कागदावरच राहानार काय? 
   दिव्यांग बांधवाना न्याय मिळावा म्हणुन केलेले निवेदन जिल्हाअधिकारी नांदेड लोकशाहि दिनी ४ जुलै,व १ ऑगस्ट ,५ सप्टेबर २०२२ तिन निवेदन देऊन न्याय मिळत नाहि.
२) मा.तससिलदार साहेब नायगाव दि.१ जुन,व ६जुन २०२२ ला निवेदन दिले.
३) मा.सहपोलिस निरीक्षक पोलीस स्टेशन रामतिर्थ दि.९जुन२२ 
४) मा.गटविकास अधिकारी साहेब.नायगाव दि.२४/६/२०२२
यांनी ग्रामसेवक यांना पंचनामा पंचासहित करण्याचे आदेश दिले पंचनमा  केला आहे.
५) मा. तहसिलदार साहेब नायगाव यांनी मंडल अधिकारी यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले पंचनामा करण्यात आला.
व तहसिलदार साहेबानी सहपोलिस निरिक्षक रामतिर्थ यांना दि.४ जुलै २०२२ ला आदेशित केले.
    

तेंव्हा दि.१ ऑगस्टला सर्व अतिक्रमणधारकास  सहपोलिस निरीक्षक साहेबानी स्टेशनला बोलाऊन त्यांना समज दिली असता आम्हि त्यांची जमिन मोजनीकरून देतो असे बोलले व दि.४ ऑगस्टला २०२२ रोजी गावातील सरपंच,पंचासमक्ष मोजणी केली असता त्या दिव्यांगाची जमीन २४ आर पैकी १५ आर जमीन दिसते तर  नऊ आर जमीन कमी निघाली ती देतो म्हणून ते देण्यास तयार नसल्यामुळे माझी वाडवडीलाची असलेली सातबाऱ्यावरची जमीन देऊन न्याय द्यावा म्हणुन दिव्यांग बांधव चंपतराव डाकोरे पाटिल शासन प्रशासन दरबारी दोन्हि पायाने दिव्यांग असुन न्यायासाठि संघर्ष करीत आहेत न्याय नाहि मिळाल्यास तिव्र संघर्ष करण्याचा ईशारा चंपतराव डाकोरे पाटिल यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिला