Ticker

6/recent/ticker-posts

टिपू सुलतान ब्रिगेड तर्फे* *सिरजखोड ता.धर्माबाद येथे* *शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा* *सत्कार*धर्माबाद /सय्यद नदीम



टिपू सुलतान ब्रिगेड तर्फे* *सिरजखोड ता.धर्माबाद येथे* *शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा* *सत्कार*
धर्माबाद /सय्यद नदीम


टिपू सुलतान ब्रिगेडच्या वतीने धर्माबाद तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सिरजखोड (मराठी आणि उर्दू माध्यम) येथे आज शिक्षक दिनानिमित्त टिपू सुलतान ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष डाॅ. ज़हीरूद्दिन पठान यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि धर्माबाद तालुकाध्यक्ष मिर्झां खुर्रम पटेल,  

तालुका उपाध्यक्ष मिर्झां इब्राहिम बेग यांच्या पुढाकारातून शाळेतील सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षक दिन कार्यक्रमात सहभागी सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक शेख अहेमद मिरा साब, शेख नसीम मॅडम, आनलदास एस. वी. मॅडम, गज़ाला जबीन मॅडम, मिर्झां सलीम बेग सर, मोहम्मद सुलतानउद्दीन सर,

 सज्जन प्रसराम मामा यांच्यासह धर्माबाद पंचायत समितीमधील शिक्षण विभागात विषय तज्ञ म्हणून कार्यरत मनोहर बोपटे सर आणि भत्ते सर यांचा सुद्धा पुष्पहार आणि पेन देऊन सत्कार करण्यात आला.
    

    याप्रसंगी सिरजखोडचे भूमिपुत्र, या शाळेचे माजी विद्यार्थी, टिपू सुलतान ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष डाॅ. ज़हीरूद्दिन पठान यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की "विद्यार्थ्यांनी खूप-खूप शिकले पाहिजे. एक आदर्श शिक्षक, डाॅक्टर, इंजीनियर, वकील, वैज्ञानिक, प्रशासकीय अधिकारी आणि देशाचे एक आदर्श नागरिक बनले पाहिजे. 

ते पुढे म्हणाले की देशाच्या जडणघडणीत शिक्षकांचे योगदान खूप मोलाचे आहे. त्यामुळे शिक्षकांचा सन्मान होणे गरजेचे आहे. 


 शिक्षकांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायावर आधारित समाज निर्माण करण्यासाठी, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक मूल्ये रूजविण्यासाठी प्रयत्न करावे. टिपू सुलतान ब्रिगेड ही मानव सेवा आणि देश सेवेस समर्पित युवकांची संघटना आहे."
      

  कार्यक्रमाचे प्रास्ताविक टिपू सुलतान ब्रिगेड धर्माबाद तालुकाध्यक्ष मिर्झां खुर्रम पटेल यांनी केले, 
सुलतानउद्दीन सरांनी सूत्रसंचालन केले, मुख्याध्यापक शेख अहेमद यांनी मनोगत व्यक्त केले आणि शेवटी टिपू सुलतान ब्रिगेड तालुका उपाध्यक्ष मिर्झां इब्राहिम