Ticker

6/recent/ticker-posts

शिक्षकदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी चालविली शाळा.कुमारेश्वर बाबा सेमी इंग्लीश स्कुल मध्ये शिक्षक दिन साजरा


शिक्षकदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी चालविली शाळा.

कुमारेश्वर बाबा सेमी इंग्लीश स्कुल मध्ये शिक्षक दिन साजरा.

प्रतिनिधी : मजहर शेख,सारखणी

सारखणी,दि,६- शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे तो जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही अशे शिक्षणाचे महत्व डॉ. बाबासाहेबांनी सांगितले आहे.दिनांक ५ सप्टेबंर हा दिवस डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन 

यांचा जन्म दिवस शिक्षक दिन म्हणुन साजरा केला जातो. याच दिनाचे औचित्य साधुन   कुमारेश्वर बाबा सेमी इंग्लीश स्कुल येथे शिक्षकदिनानिमित्त 

या अभिनव उपक्रमात विद्यार्थीच मुख्याध्यापक व शिक्षक होऊन  विद्यार्थ्यांनी चालविली शाळा.याप्रसंगी  सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र तिडके 

 तर प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मण मिसेवार,बळवंत वाढई ,सय्यद सौरभ उपस्थित होते.या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांविषयी आदर निर्माण होऊन त्यांच्या आत्मविश्वास निर्माण झाल्याचे मत  सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र तिडके 

यांनी व्यक्त केले .शिक्षकांनी उत्तम नियोजन केल्याबद्दल त्यांचे देखील त्यांनी कौतुक केल . याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या वेशभूषा परीधान केल्या होत्या.तसेच प्रमुख अतिथीनी शिक्षक दिना बद्दल माहीती  सांगीतली 

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पंकज राठोड व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या .