Ticker

6/recent/ticker-posts

ग्राम पंचायत निवडणूक गोकुंदानवीन पॅनल ,नवा चेहरा - विकासाचा मोहरा?जुन्या व प्रचलित पॅनलला वैतागलेल्या नागरिकांचा निर्धार!


ग्राम पंचायत निवडणूक गोकुंदा

नवीन पॅनल ,नवा चेहरा - विकासाचा मोहरा?

जुन्या व प्रचलित पॅनलला वैतागलेल्या नागरिकांचा निर्धार!

गोकुंदा (प्रतिनिधि)

           किनवट तालुक्यात ४७ ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे.त्यात जनता जुन्यांना डच्चू देऊन नव्याँना उभारी देतील का? अशी चर्चा किनवट तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या गोकुंदा येथील जनतेत सुरू आहे.

 दिनांक १८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मतपेटीत जनतेने आपला कौल दिलेला पहाव्यास मिळेल पण उत्सुकता ती १९ सप्टेंबर रोजी ची ह्या दिवशी मतमोजणी असून कोणाचे भाग्य उजडेल व नव्या पॅनल व चेहऱ्यांना संधी देऊन आपल्या गावाच्या विकास साधतील हे काळच ठरवेल. 

परंतु किनवट शहरा जवळ असलेल्या मिनी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोकुंदा ग्रामपंचायत मध्ये गेल्या काही वर्षापासून एकच पॅनलचे वर्चस्व आहे तर ह्यात गावाचा विकास खुंटल्याची चर्चा येथील नागरिक बोलताना दिसून येत आहे.जनतेला पाहिजेत त्या रोड, स्वच्छ पाणी, लाईट, स्वच्छता यासारख्या जीवन आवश्यक गोष्टी पासून 

येथील जनता मुकली असून या वेळी जनता नविन पॅनल व नवा चेहऱ्यांना संधी देईल का? असे अनेक प्रश्न निरुत्तरित असून जनतेने दिलेला कॉल सर्वस्वी ठरणारच आहे. 

परंतु गेल्या कितेक वर्षापासून अनेक समस्यांचे माहेरघर बनले असलेल्या गोकुंदा ग्रामपंचायत मध्ये भूखंडाबद्दल न बोललेलेच बरे म्हणल्या जात आहे. तर गेल्या अनेक वर्षापासून एका हाती सत्ता असणाऱ्या

 गोकुंदा ग्रामपंचायतित विकास कामाचे तीन तेरा वाजलेले असून पैशातून राजकारण व स्वहित जोपासणाऱ्याला येथील जनता सत्तेपासून खाली ओढून नव्या व विकासभिमुख चेहऱ्यांना संधी देणार असल्याची चर्चा सध्या गल्लीबोळातील चौका चौकात होताना दिसून येत आहे. 


नेहमीच्या त्याच त्या पॅनल व सदस्यांना जनता वैतगली असल्याने नविन पॅनल ,नवा चेहरा-विकासाचा मोहरा, असा नवा सदस्य व पॅनल पाठविन्याचा संकल्प नागरिकांनी केला आहे

मागील सदस्य बरोबरच नेहमीच्या प्रचलित पॅनल ला सुद्धा दणका देण्याचा मनोदय सुशिक्षित आणि जागरुक जनतेतुन बोलला जात असून हीच विकासाची नीति जिल्हा परिषद व पंचायत समिति निवडणुकीत सुद्धा राबविली जाणार असल्याचे नागरिकांतुन व्यक्त होताना दिसून येत आह