Ticker

6/recent/ticker-posts

किनवट येथील सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्पाधिकारी किर्तीकिरण पुजार यांची रत्नागिरी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदली झाली.


किनवट येथील सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्पाधिकारी किर्तीकिरण पुजार यांची रत्नागिरी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदली झाली.

 त्यानिमित्त त्यांना स्थानिक कर्मचार्‍यांच्या वतीने शुक्रवारी दि.30 रोजी त्यांना निरोप देण्यात आला.  "
  

कीर्ति कुमार पुजार यांनी आपल्या 26 महिन्याच्या कार्यकाळात आदिवासींच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याला प्राधान्य दिले. आदिवासींच्या जमिनींचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. खर्‍या गरजूंना न्याय देण्यासाठी पुजार यांनी पुढाकार घेत हा प्रश्‍न सोडविला.

 कोरोनाकाळात तालुक्यातील जनतेला त्वरित आरोग्य सेवा मिळण्यासाठी ते स्वतः प्रयत्नशील होते. आदिवासींसाठी असलेल्या सर्व योजना

 त्यांनी काटेकोरपणे राबवून आलेल्या आदिवासी निधीचा 100 टक्के त्यांनी योग्य वापर केला. 

खासदार, आमदार, जिल्हाधिकारी तसेच अधिकारी कर्मचार्‍यांचे त्यांना चांगले सहकार्य मिळाले. कर्तव्यदक्ष अधिकारी असलेल्या पुजार यांच्याच प्रयत्नातून तालुक्यातील शेकडो विद्यार्थिनींना टाटा इलेक्ट्रॉनिक्स कंपनीत रोजगारासह शिक्षणाची संधी मिळाली.

 जीर्ण झालेल्या प्रकल्प अधिकारी कार्यालयाची त्यांनी उचित डागडुजी करुन या कार्यालयाचे रुप बदलले कीर्ति कुमार सर 

यांची रत्नागिरी येथे बदली झाल्याबद्दल प्रकल्प अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्‍यांच्या वतीने शहरातील एन.के.गार्डन

 येथे शुक्रवारी त्यांना समारंभपूर्वक निरोप देण्यात आला.याप्रसंगी पुजार यांनी त्यांचा कार्यकाळ यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. 

यावेळी डॉ.वसंत बामणे यांच्या सुंदर हॉस्पीटलच्या वतीनेही पुजार यांचा सत्कार करण्यात आला