माहूर येथील पत्रकारावर दाखल झालेला गुन्हा परत घ्या; पत्रकार सेवा संघाची मागणी!
तहसीलदारांना निवेदन!
किनवट:- माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर हजर राहत नसल्याने दिनांक ३० सप्टेंबर रोजी माहूर ग्रामीण रुग्णालय सलाईन वर व दिनाक ३ ऑक्टोंबर रोजी ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सेवेची ऐसी तैसी या मथड्या खाली बातमी प्रकाशित करण्यात आली होती.
याचा राग धरून ग्रामीण रुग्णालयात कंत्राटी डॉक्टर म्हणून कार्यरत असलेले डॉ.निरंजन केशवे यांनी खोटी तक्रार देऊन माहूर च्या पुण्यनगरी प्रतिनिधी सरफराज दोसानी यांच्यावर राजकीय दबाव टाकून खंडणीची खोटी तक्रार दिली.
पोलिसांनी कुठलेही पुरावे नसतांना गुन्हा दाखल केला.याच्या निषेधार्थ आज दिनांक ११ रोजी प्रेस संपादक, पत्रकार सेवा संघाने तहसीलदार मृणाल मैडम जाधव
यांची भेट घेऊन माहूर येथील घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. व निवेदनात गुन्हा परत घेण्याची मागणी केली.
कुठलाही पुरावा नसताना केवळ राजकीय व व्यक्तिक द्वेषाने दिलेल्या अर्जावर माहूर पोलिसांनी पत्रकारावर गंभीर गुन्हे दाखल करून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची मुस्कट दाबी करण्याचा प्रयत्न केला आहे.
हा प्रकार पत्रकारांच्या लेखणी वर गडा आणणारा असून
लोक सिद्धार्थ बातमी प्रकाशित करणाऱ्या माध्यमांच्या प्रतिनिधी ची मुस्कट दाबी करणारा आहे.
डॉ.निरंजन केशवे
यांनी माहूर पोलिसात दिलेले खोटे अर्ज व त्यावरून दाखल झालेला खोटा गुन्हा रद्द करावा
अशी मागणी निवेदाद्वारे आशिष शेळके,राजेश पाटील,आनंद भालेराव,विशाल गिमेकर,शेख फारुक, नाशिर तगाले,
सय्यद नदीम,प्रणय कोवे,मारोती देवकते,रमेश परचाके यांनी केली आहे.
तर ज्येष्ठ पत्रकार मिलिंद सर्पे,मलिक चौहान,कामराज माडपेल्लीवार,दुर्गा दास राठोड,