Ticker

6/recent/ticker-posts

किनवट/प्रतिनिधी- ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता किशोर संद्री विरुद्ध कनिष्ठ अधिकार्‍यांसह कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजेचे आंदोलन छेडताच बुधवारी (१२ आॅक्टोबर) चौकशी करण्यात आली


किनवट/प्रतिनिधी- ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता किशोर संद्री विरुद्ध कनिष्ठ अधिकार्‍यांसह कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजेचे आंदोलन छेडताच बुधवारी (१२ आॅक्टोबर) चौकशी करण्यात आली.

 चौकशी समिती समोर दोन्ही पक्षकारांनी बाजू मांडली. 

आता चौकशी समितीच्या अहवालानंतर जिल्हा प्रशासन कोणते पाऊल उचलणार ? याकडे किनवट कार्यालयासह ग्रामसेवकांचे लक्ष लागून असणार आहे.
        

आंदोलना दरम्यान दोन दिवस पाणीपुरवठा कार्यालय कुलूपबंदच होते.

 जिल्हा प्रशासनाकडे तळ ठोकून बसल्यानंतर १२ आॅक्टोबर रोजी  चौकशी समिती किनवटात दाखल झाली. 

उपअभीयंता संद्री आणि कर्मचार्‍यांची प्रत्यक्ष चौकशी करण्यात आली. ग्रामसेवक संघटनाही उपअभियंता हटावच्या भूमिकेत दिसतात. 

न हटवल्यास पाणीपुरवठा योजनेच्या कामावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही ग्रामसेवक संघटनांनी दिल्याचे समजते. नांदेडच्या कार्यकारी अभियंत्यांनी दोघांचीही सुनावणी घेतली होती. 
       

चौकशी समितीच्या अहवालावर जिल्हा प्रशासन काय कार्यवाही करणार ? याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. 

संद्री विरुद्ध सर्व कर्मचारी असहकाराची भूमिका घेत असतील तर वरिष्ठांनी गांभीर्याने घेऊन तडकाफडकी निर्णय घेणे आवश्यक आहे. 

एवढी फटफजित होत असेल आणि विकासकामांतर त्याचा परिणाम होत असेल तर संद्रींनीही सावध होण्याची गरज असल्याचे अनेकांचे मत आहे.