Ticker

6/recent/ticker-posts

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघकिनवट तालुका कार्यकारिणी आढावा बैठक संपन्न ;किनवट-माहूर युवा ता.अध्यक्षाची तर माहूर तालुका अध्यक्षाची निवड



प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ
किनवट तालुका कार्यकारिणी आढावा बैठक संपन्न ;किनवट-माहूर युवा ता.अध्यक्षाची तर माहूर तालुका अध्यक्षाची निवड 

किनवट/प्रतिनिधी:प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ किनवट तालुका कार्यकारिणीची आढावा बैठक मराठवाडा सरचिटणीस आनंद भालेराव

 यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाध्यक्ष संजयकुमार गायकवाड, मराठवाडा युवा अध्यक्ष मारोतराव झमपलवाड, जिल्हाउपाध्यक्ष उद्धव मामडे,दत्ता बोईनवाड (भोकर ता.उपाध्यक्ष),

 पत्रकार सुभाष नाईक, मा.अनिल डोईफोडे भोकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक तालुका सचिव नसीर तगाले यांनी केले. तर ता.अध्यक्ष आशिष शेळके यांनी एक वर्षात संघटनेने केलेल्या कामाचा आढावा सांगितला. 

याप्रसंगी पत्रकार सेवा संघाच्या अनेक पत्रकारांनी दोन वर्षाच्या कार्यकाळात संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे सरांच्या  मार्गदर्शनाखाली प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने आपल्याला कशा पद्धतीने मदत केली.व कार्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.


या कार्यक्रमात किनवट तालुका युवा अध्यक्षपदी युवा पत्रकार प्रणय रमेश कोवे यांची निवड करण्यात आली तर माहूर तालुका युवा अध्यक्षपदी शेख राजिक (वाई) यांची निवड करण्यात आली. माहूर तालुका अध्यक्षपदी फिरोज पठाण यांची एकमताने निवड करण्यात आली.

   तसेच किनवट कार्यकारणीत नवीन सदस्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यांच्या निवडीचे पत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 

धर्माबाद जिल्हा नांदेड येथे ३० ऑक्टोबर रोजी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचा भव्य राज्यस्तरीय मेळावा कार्यक्रम संपन्न होणार आहे याबद्दल जिल्हाध्यक्ष  संजयकुमार गायकवाड 

यांनी माहिती देऊन सर्वांना निमंत्रित केले. या मेळाव्यात समाजात चांगले काम करणाऱ्या सर्व क्षेत्रातील योग्य व्यक्तींचा सन्मान व सत्कार करण्यात येणार आहे. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार विशाल गिमेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष अध्यक्ष आशिष शेळके यांनी केले.


कार्यक्रमास आनंद भालेराव,आशिष शेळके,नसीर तगाले,शेख फारूक आतिफ भाई , प्रणय कोवे,मारोती देवकते,राज माहुरकर, विशाल गिमेकर, सय्यद नदीम, राजेश पाटील, 

रमेश परचाके,बाबुराव वावळे,सुहास मुंडे, लखन जाधव, सत्कार महामुने पाचुंदा माहूर,लक्ष्मण सदाशिव पाचुंदा माहूर, शेख राजिक शेख शब्बीर,चंद्रकांत कागणे , 

रावसाहेब कदम , किरण कुमार वानखेडे ,विशाल सुरेश भालेराव इस्लापूर, जितेंद्र अमरसिंग चव्हाण माहूर, विजय माधवराव वाघमारे गोकुंदा, गंगाधर कदम, सलमान खान,अरविंद सूर्यवंशी,जितेंद्र चव्हाण वनोळा आदी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ
किनवट तालुका कार्यकारिणी आढावा बैठक संपन्न ;किनवट-माहूर युवा ता.अध्यक्षाची तर माहूर तालुका अध्यक्षाची निवड