कोठारी पुलासाठी मी सातत्याने पाठपुरावा करून निधी मिळून दिला. नव्या पुलामुळे या भागातील शालेय विद्यार्थी,शेतकरी व नागरिकांना मी जीवघेण्या प्रवासातून कायमस्वरूपी मुक्त केले याचा आत्मिक समाधान लाभत आहे आमदार भीमराव केराम
किनवट प्रतिनिधी किनवट माहूर तालुक्याच्या विकासाबाबत मी नेहमीच जबाबदारीने काम केले आहे. या मतदार संघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने येथील जनतेला मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देणे हे मी माझे आद्य कर्तव्य समजतो.
कर्तव्य आणि जबाबदारीच्या जाणिवेतूनच कोठारी पुलासाठी मी सातत्याने पाठपुरावा करून निधी मिळून दिला. नव्या पुलामुळे या भागातील शालेय विद्यार्थी,
शेतकरी व नागरिकांना मी जीवघेण्या प्रवासातून कायमस्वरूपी मुक्त केले याचा आत्मिक समाधान लाभत आहे असे प्रतिपादन आमदार भीमराव केराम यांनी केले.
जवळपास तीन दशकापासून प्रलंबित असलेल्या किनवट ते शनिवारपेठ मार्गावरील कोठारी पुलाच्या बांधकामाचा शुभारंभ सोहळा शुक्रवारी कोठारी येथे संपन्न झाला
त्यावेळी आ भीमराव केराम अध्यक्षीय समारोप करताना बोलत होते व्यासपीठावर कॉ गंगारेडी बेनमवार, कोठारीचे सरपंच गेडाम, बोधडी खुर्दचे उपसरपंच डॉ नामदेव कराड,
अनुसूचित जनजाती आयोगाचे गोवर्धन मुंडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.प्रारंभी आ भीमराव केराम यांच्या हस्ते विधिवत पूजा करून व कुदळ मारून पूल बांधकामाचा थाटामाटात शुभारंभ करण्यात आलायाप्रसंगी पुढे बोलताना
आ केराम म्हणाले की माझ्या 30 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत लोकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी मी संघर्ष केला. आमदार नसतानाही लोकहितांसाठीच शासन प्रशासनासी झगडत राहिलो. यापूर्वी केवळ 18 महिन्याचा
आमदार असताना सिंचन शिक्षण रस्ते व पिण्याच्या पाण्यासाठी निधी खर्च करताना कधीही हात आखडता घेतला नाही या वेळेला पाच वर्षे मिळाली परंतु सरकार आमचे नव्हते त्यातच सलग दोन वर्षे कोरोनाचे संकट उभे राहिल्याने अपेक्षित विकास निधी खेचून आणण्यात अडचणी निर्माण झाल्या.
कोरोनाचा काळ वगळता व नवीन सरकार स्थापनेचा कालावधी पाहता या वेळेसही माझ्याकडे केवळ 18 महिन्याचाच कालावधी शिल्लक आहे. या 18 महिन्यात विकासाचा अनुशेष भरून काढण्याचा
माझा कसोशीचा प्रयत्न राहील तुमचा लोकप्रतिनिधी या नात्याने नैतिक जबाबदारी व कर्तव्य भावनेतूनच काम करण्याचा माझा स्वभाव आहे आणि याच भावनेतून मी कोठारी पुलासाठी मंत्रालय स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला आणि यश मिळाले नवीन पुलाच्या माध्यमातून मी
या भागातील शालेय विद्यार्थी, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना जीवघेण्या प्रवासातून कायमचे मुक्त केले याचे मला आत्मिक समाधान लाभत आहे. किनवट मतदारसंघातील विकास कामांच्या श्रेयवादावरून
त्यांनी माजी आमदाराला चिमटा घेतला.आमदार झाल्यानंतर स्थानिक विकास निधी काय असतो याची जाण नसणाऱ्यांनी कोठारी फुलाच्या बांधकामा संदर्भात वारंवार केंद्र सरकारकडे बोट दाखवून जबाबदारीतून पळ काढल्याचे ते म्हणाले.
राजकीय विरोधक म्हणून विकास कामांची स्पर्धा असावी परंतु श्रेयवादाची स्पर्धा नसावी असा सल्लाही त्यांनी यावेळी बोलताना दिला
येत्या पावसाळ्यापूर्वी कोठारी पुलाचे बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी बांधकाम करणाऱ्या संस्थेला दिल्या आहेत. कॉ गंगा रेडी बैनमवार, माजी उपसभापती गजानन कोल्हे पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे, गुत्तेदार उत्तम जाधव
आदींनी आपापल्या मनोगतातून कोठारी नाल्यावरून पावसाळ्याच्या दिवसात होणारे अपघात व जीवघेण्या प्रवासाबद्दल माहिती देत या पुलासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार भीमराव केराम
यांचे आभार व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा ओबीसी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बाबुराव केंद्रे यांनी केले. सूत्रसंचालन कराड सर यांनी केले तर भाजप तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले
या उद्घाटनाच्या कार्यक्रमास भाजपचे नेते अनिल तिरमनवार, गोकुंदाचे सरपंच अनुसया संजय सिडाम, उपसरपंच सरू भाई , अकबर खान ,नगरसेवक अजय चाडावर ,
अनिरुद्ध केंद्रे, विवेक केंद्रे ,निळकंठ कातले ,संतोष मरस्कोल्हे, सुनील मच्छेवार ,शासकीय गुत्तेदार संघटना , कोठारी शनिवारपेठ, मदनापुर, दरसांगवी,
दाभाडी, कोपरा, यंदा पेंदा, नागसवाडी, बोधडी खुर्द यासह जवळपास 15 ते 20 गावातील सरपंच, उपसरपंच, प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोठारी पुलासह गोकुंदा
येथे ठाकरे चौक ते मंगाबोडी रस्त्याचे सुधारण कामाचे भूमिपूजन ही करण्यात आले तसेच माहूर येथील बाह्य वळण (बायपास)रस्त्याची सुधारणा 250 लक्ष,
बाह्य वळण रस्ता सुधारणा 250 लक्ष,मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालय ईमारत बांधकाम 625 लक्ष,
महसूल अधिकारी वर्ग 2,3,4 निवासस्थान बांधकाम 1297लक्ष अशा कोट्यावधी रु च्या विकास कामांचे उदघाटनही आ भिमराव केराम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले