रेती तस्करीची बातमी का प्रकाशित केली यासाठी पत्रकाराच्या घरी जाऊन वडिलाला मारहाण करणाऱ्या शिवीगाळ करणाऱ्या सायफळ गावातील पोलीस पाटला विरुद्ध गुन्हा दाखल...
माहूर तालुक्यात असलेल्या सायफळ गावातील ग्रामीण भागातील पत्रकार तथा प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे माहूर तालुका अध्यक्ष राजीक शब्बीर शेख
यांनी म मराठी न्यूज नेटवर्क वेब पोर्टलवर जप्त केलेले रेती साठ्यातूनच होत आहे रेतिची विक्री अशी बातमी 19.10.2022 रोजी प्रकाशित केली होती
रेती तस्कर तथा सायफळ गावाचे पोलीस पाटील हेमंत उत्तम गावंडे हे 12.30 सुमारास पत्रकार राजिक शेख यांच्या घरी जाऊन ते हजर नसताना
त्याच्या वडिलांना कॉलर धरून घरातून बाहेर काढले व तुझ्या पोराला मी तलवारीने कापून टाकतो व गाडीखाली घेतो बंदुकीची गोळी घालतो अशा धमक्या देत
मी गावाचा पोलीस पाटील माझ्या नादी त्याने लागू नये मी दोन नंबरचे धंदे कसेही चालू शकतो मला अडवणार कोणी नाही तुझ्यापोराने बातमी लावली
मी त्याचा गेम करणार म्हणजे करणार अशी धमकी पत्रकार राजीक शेख यांना दिली व त्यांच्या आईला मोठ्या प्रमाणात अशिल्य शिवीगाळ केली.