Ticker

6/recent/ticker-posts

सर्वसामान्य भक्तांसोबत पंगतीत बसून जेवण करणारा आमदार शोधून सापडणे दुर्मिळ आहे! परंतू किनवट/माहूर विधानसभा मतदारसंघातील आम्ही मतदाते मात्र भाग्यवान आहोत. *किनवट/माहूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा. भिमरावजी केराम साहेब हे


सर्वसामान्य भक्तांसोबत पंगतीत बसून जेवण करणारा आमदार शोधून सापडणे दुर्मिळ आहे! परंतू किनवट/माहूर विधानसभा मतदारसंघातील आम्ही मतदाते मात्र भाग्यवान आहोत. 

*किनवट/माहूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा. भिमरावजी केराम साहेब हे 

महाराष्ट्र विधीमंडळासाठी आमदार असतील परंतु आमच्या साठी मात्र अजूनही जमीनीवर पाय टेकवून असलेले सर्वसामान्य नेतृत्व आहेत.

* कधीही हि आपल्या पदाचा मोठेपणा नाही, कधीही व्हि आय पी ट्रीटमेंट ची अपेक्षा नाही.

 *आमदार मा. भिमरावजी केराम साहेब* स्वतःला नेहमी सर्वसामान्याचे लेकरू म्हणवून घेतात व आपल्या वागण्यातून तसे नेहमी सिध्द हि करतात.

असाच अनूभव आज मालवाडा ( माहुर) इथे बेहरे महाराजांच्या मठात आला. आपल्या माहुर प्रवासात असताना अचानक आमदार साहेबांनी बेहरे महाराजांच्या मठात भेट दिली. 

आई भवानी ची पुजा अर्चना करून बेहरे महाराजांचा आशीर्वाद घेतला. मठात कन्याभोजनाचा नियोजित कार्यक्रम होता. योगायोगाने आमदार साहेब हि त्याच वेळेस उपस्थित झाले होते... 

लगेच भक्तांनी आमदार साहेबांना जेवणाचा आग्रह केला व तशी व्यवस्था हि रूम मध्ये केली. 

परंतू चक्क आमदार साहेबांनी सरळ पंगतीत बसून सगळ्यांसोबत जेवण केले.. एवढे साधेसुधे व्यक्तीमत्व दूर्मीळच आहे...