पैनगंगा वन्यजीव अभयारण्यात वन्यजीव सप्ताह निमित्त सलग तिन वर्ष श्रमदान.
किनवट:(तालुका प्रतिनिधी)
जागतिक वन्यजीव सप्ताह निमित्त 2 ऑक्टोंबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनाचे अवचित्त साधत सकाळी ६ वाजता पैनगंगा अभयारण्य
खरबी येथे सलग तिन वर्ष मॉर्निंग किनवट ग्रुप व वनपरिक्षेत्र कार्यालय खरबी यांच्या संयुक्त विद्यमान श्रमदान करण्यात आले. यावेळी श्रमदानातून दगडी बांध उभारण्यात आला.
किनवटसाठी वरदान ठरलेला व मराठवाडा विदर्भाच्या सीमेवर किनवट पासून काही कि. मी अंतरावर असलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प (वन्यजीव) अमरावती अंतर्गत वनपरिक्षेत्र कार्यालय
खरबी येथे नागरिकांमध्ये वनानंविषयी आवड निर्माण व्हावी व वन्यजीव विषयी जागृती करण्यासाठी वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला.
वन्यजीव सप्ताह निमित्त सलग तीन वर्ष मॉर्निंग ग्रुप यांनी या ठिकाणी श्रमदान करून दगडी बांध उभारला आहे हे विशेष. तर जी 7 ग्रुपच्या सदस्यांनी श्रमदानात आपला सहभाग नोंदविला आहे.
गेल्यावर्षी अशाच प्रकारे श्रमदान करुन दगडी बांध उभारला होता. या कार्याची खुद्द खा. छत्रपती संभाजी महाराज यांनी दखल घेत प्रत्यक्ष पहाणी केली होती.
मॉर्निंग वॉक ग्रूपच्या कार्याचा गौरवही त्यांनी केला होता.
या कार्यक्रमा वेळी वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन आटपाटकर, ए. पी.आय विशाल वाठोरे, पी.एस.आय मिथुन सावंत,
बाळकृष्ण कदम, किनवटचे आरएफओ प्रमोद राठोड, वनपाल माजळकर, कत्तूरवार बाळकृष्ण आवळे, संजय मेहता, विश्वजीत सुर्यवंशी, अजय पावडे, संजय धोबे, वनक्षेत्रपाल इंगले,
शिंगनजोडे, वनरक्षक इंगोले, काशिदे, मुजमुले, शेंबाळे, मुंडे, कानडे, टोगंळे, बोबंले, वनमजूर तौसिफ पठान, पंकज राठोड, अधिराज कदम, प्रविण गुट्टे, निहील इरपनवार, सौरभ सिरमनवार, यश चाडावार,