Ticker

6/recent/ticker-posts

राज्य शिक्षण विभागाच्या ० ते २० पटसंख्येतील जि.प.शाळा बंद करण्याचा आदेश रद्द करण्यात यावा _ गोर सेना


राज्य शिक्षण विभागाच्या ० ते २० पटसंख्येतील जि.प.शाळा बंद करण्याचा आदेश रद्द करण्यात यावा _ गोर सेना

प्रतिनिधी : राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदेच्या ० ते २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार हालचाली सुरू केल्या आहेत.

या निर्णयामुळे तांडा, वाडी पाड्यावरिल विद्यार्थ्यांच्या प्रश्न निर्माण झाला असून पुढील भवितव्य अंधारात जात आहे

बहुतांश विद्यार्थी डोंगर दर्यात, वाडी वस्तीतील आदिवासी दलित गोरं बंजारा बहुजन समाजातील विद्यार्थी आहेत.

त्यांच्या शिक्षण फिरकिवण्याचे  काम केंद्र सरकार व राज्य सरकार करत आहे.


तरी हा आदेश रद्द करून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी शाळा चालूच ठेवावीत असे आशयाचे निवेदन गोरसेना या सामाजिक संघटनेच्या वतीने तहसील कार्यालय किनवट येथे देण्यात आले.

हा निर्णय महाराष्ट्र शासनाने लवकर रद्द नाही केल्यास संपूर्ण महाराष्ट्र भर गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष संदेश भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वात तीव्र असे आंदोलन छेडण्यात येईल  


निवेदन देताना.. गोर सेना ता. अध्यक्ष अतुल राठोड. गोर सेना शहर अध्यक्ष प्रदीप राठोड.ता. उपाध्यक्ष ad टेक्सिंग