वाढिव पाणी पुरवठा योजनेच्या पाईप लाईनसाठी जगोजागी खोदलेल्या मोठ-मोठे जीवघेणे खड्डे तसेच सोळल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे आणी संपूर्ण शहरात घाणीचे साम्राज्य पसरल्याने रोगराईचा धोका वाढला आहे,
या गंभीर समस्यापासून नागरिकांना मुक्ती द्यावी.
माजी नगरसेवक 'अलीमोहम्मद खान दोस्तमोहम्मद खान' यांची मागणी..
किनवट नगर परिषदे मार्फत वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या कामात शहराच्या प्रत्येक गल्लो गल्लीत पाईपलाइनसाठी मोठ मोठे खड्डे खोदण्यात आले व समबंधित गुत्तेदारने थातुर माथुर पद्धतीने खड्डे बुझविल्याने पावसाच्या पाण्यात
सर्व खड्डे खचून गेल्याने प्रत्येक गल्ली बोळीत मोठ मोठे जीवघेणे खड्डे निर्माण झाल्याने नागरिकांना ही खड्डे धोकयाची घण्टा ठरत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे,
दररोज अनेक बालके, व्रद्ध व वाहन चालक या खड्यात पळून जख्मी होत आहे एकूणच पाइपलाइनची तसेच सोडून दिलेली ही जीवघेणे खड्डे राहदरिसाठी मोठी अड़चन ठरत आहे व अपघात वाढत आहे.
पाइपलाइनच्या कामामुळे नगर परिषदेने जवळच्या काळात बनविलेल्या 28 कोटिंच्या नवीन सी.सी.रसत्यांची ही वाट लागली आहे,
गावचे विद्रुपिकरण झाले आहे, केव्हा है काम पूर्ण होणार व केव्हा या खड्यापासुन मुक्ती मिळणार याकळे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
घनकचराच्या कामात ही नगर परिषदेच्या पदधिकार्यान्चे काहीच लक्ष नाही. गुत्तेदाराने मजूरांची संख्या व वाहनांची संख्या कमी केल्याने गुतेदार आपला खिशा भरत आहे व साफ सफाइच्या काम बरोबर होत नसल्याने गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
भाजपाची एकहाती सत्ता असलेल्या किनवट नगर परिषदेत खूप विकास केल्याचा गाजावाजा भाजपडून केक्ल जात आहे, पण प्रत्यक्षात कोणालाही यांचा अदृश्य विकास दिसत नाही.
नावाचा विरोधिपक्ष ठरलेल्या कांग्रेस,राष्ट्रवादीच्या नगर सेवकांचा यांना प्रत्येक कामात हिस्सा व सम्पूर्ण एकमुखी पाठिम्बा राहिल्याने या 5वर्षाच्या कार्यकाळात विरोधी पक्ष होता कि नव्हता ? हे नागरिकांना समझलेच नाही.
येणाऱ्या निवडणुकीत हे लोकप्रतिनिधि कोणत्या कामच्या आधारे जनतेकळे जाऊन मते मागणार असा प्रश्न जनतेत चर्चिला जात आहे, जनता अश्या कुचकामी प्रतिनिधींना जबाब विचार यांना पाच वर्षाचा हिशोब मागून धड़ा शीकवनार.
वरील गम्भीर विषयी मे.मुख्य अधिकारी साहेबांनी त्वरित योग्य कार्यवाही करुन उपाय योजना करावी आणि जीवघेण्या खड्यापासुन व घाणीच्या साम्राज्यापासून नागरिकांना नागरिकांना मुक्ती द्यावी,