ब्रेकींग: 100 दिवसा अखेर संजय राऊत यांना जामीन मंजूर,
पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणामध्ये अडकलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज पुन्हा एकदा सुनावणी पार पडली.
आतापर्यंत मुंबई न्यायालयाने जामीन अर्जाचा निर्णय राखून ठेवला होता.
पण अखेर संजय राऊत यांना आज जामिन मिळाला आहे. आता ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
पत्राचाळ घोटाळाप्रकरणी अटक झाल्यापासून राज्यात वेगवेगळ्या घडामोडींनी जोर धरला आहे. सत्ता स्थापनेसाठी असलेला संघर्ष संपून 3 महिने उलटले आहेत.
आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली.
न्यायाधीश देशपांडे यांनी संजय राऊत यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. आज कार्यकर्त्यांनी कोर्टाबाहेरच मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टानं राऊतांच्या जामीन अर्जावर निर्णय अद्याप प्रलंबित ठेवला होता. आजच्या सुनावणीकडे राज्याचे लक्ष लागून होते.
आज सुनावणी झाली असता संजय राऊत यांना आज जामीन मंजूर झाला आहे.
असं सांगण्यात येतंय की, 100 दिवसानंतर संजय राऊत यांना हा जामीन मिळाला आहे. तसेच काही कागदोपत्री प्रक्रिया आटोपल्यानंतर संध्याकाळपर्यंत ते तुरुंगाबाहेर येण्याचा अंदाज आहे.
राज्यात काही दिवसांपूर्वी गोरेगाव येथील पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणामध्ये शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना ईडीने जून महिन्यामध्ये ताब्यात घेतलं होतं.
बरेच दिवस चौकशी होऊन नंतर संजय राऊत यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. संजय राऊत यांचा मुक्काम हा आर्थर रोड कारागृहामध्ये हलवण्यात आला होता.
आता आज त्यांची येथून सुटका होणार असल्याने आता राज्यात आणखी राजकीय वातावरण तापणार का किंवा नवीन राजकीय डावपेच पाहायला मिळणार का हे लवकरच समजणार आहे.