Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामसेवक संघटनेचे असहकार आंदोलन,28 रोजी पंचायत समिती समोर धरणे


ग्रामसेवक संघटनेचे असहकार आंदोलन,28 रोजी पंचायत समिती समोर धरणे .
किनवट  l प्रतिनिधी.

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा नांदेड यांच्या पत्रान्वये ग्रामसेवक संवर्गाच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यामुळे दिनांक 24. 11. 2022 पासून संघटना सहकार बेमुदत आंदोलन करीत असून

 28. 11. 22 रोजी पंचायत समिती समोर धरणे करण्यात आले. असहकार आंदोलन काळात कुठल्याही प्रशासकीय बैठकीस हजर न राहणे, वरिष्ठ कार्यालयास अहवाल न देने,

 दप्तर तपासणी सहकार्य न करणे, हंगरगाव  व गुंडोपन दापका येथील नव्याने चौकशी करणे, बिडीओ यांना प्रदान केलेले निलंबनाचे अधिकार रद्द करणे, ग्रामसेवकांना दिला जाणारा पुरस्कार नियमित वितरित करणे, 

आश्वासित योजनेची 10,20, व 30 लाभ न देणे, इतर विभागातील अतिरिक्त कामाचा बोजा कमी करणे, आदर्श पुरस्कार प्राप्त ग्रामसेवकांना कोर्टाच्या आदेशान्वये एक वेतन वाढ प्रदान करणे, कंत्राटी ग्रामसेवकांना नियमित करणे, 

त्यांचा मानधन वेळेवर वाटप करणे, विविध पुराव्यानिशी दिलेल्या तक्रारीची दखल घेणे, आय सी आय बँकेतील सततची होणारी गैरसोय दूर करणे, बांधकाम कामगार प्रमाणपत्र देण्याची लेखी आदेश प्रदान करणे,

 पंधराव्या वित्त आयोगाची आराखडे तयार करून ऑनलाईन प्रशिक्षण देणे, दिव्यांग, जीएसटी, बांधकाम नोंदणी, 

इ निवेदन प्रशिक्षण देणे, आणि सेवा जेष्ठता यादीतील त्रुटीची दुरुस्ती करण्यास टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी करणे. 

आदी मागण्याचा निपटारा करण्यासाठी ग्रामसेवक संघटना किनवट च्या सर्व ग्रामसेवकांनी उत्स्फूर्तपणे

 या असहकार आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला असल्याचे दिसून येत आहे.