अकरा वर्षाच्या चिमुकलीच्या उपचारासाठी खासदार हेमंत पाटील आले धावून
प्रधानमंत्री राष्ट्रीय सहाय्यता निधितून दोन लाख ४७ हजाराची मदत
किनवट/माहूर – आरोग्य सेवा हिच ईश्वर सेवा. या हेतूने खासदार हेमंत पाटील मागील अनेक वर्षापासून विविध माध्यमातून सामान्य कुटुबातील गरजवंत रुग्णांची सेवा करत आहेत.
किनवट येथील ११ वर्षाच्या मुलीस दूर्धर आजार झाल्याचे निदान झाल्यानंतर तक्कलवार कुटुंबियांनी खासदार हेमंत पाटील यांच्याशी संपर्क साधला,
खासदार हेमंत पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता आरोग्यदूताच्या माध्यमातून तक्कलवार कुटुंबियांना प्रधानमंत्री राष्ट्रीय सहाय्यता निधितून दोन लाक ४७ हजार ५०० रुपयाची मदत मिळवून दिली.
प्रत्येक व्यक्तीस वेळेवर आरोग्य उपचार मिळावेत या हेतूने खासदार हेमंत पाटील यांनी विशेष आरोग्यदूताची नेमणूक केली आहे.
या माध्यमातून रुग्णास आरोग्याशी निगडीत लागणारी कागदपत्रे, अवश्यकता असल्यास रुग्ण व नातेवाईकांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था,
रुग्ण रुग्णालयात पोहचल्यानंतर विविध विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांना फोन करुन योग्य तपासण्या व उपचारासाठी हवी ती मदत या आरोग्यदूताच्या माध्यमातून केली जाते.
त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयात कधीच एकटे असल्याचे भावना मनात येत नाही. रुग्ण उपचार घेऊन प्रकृती ठणठणीत झाल्यानंतर घरी परत येईपर्यंत त्याच्या संपर्क ठेवला जाते.
किनवट तालुक्यातील तक्कलवार कुटुंबातील एका ११ वर्षाच्या मुलीस दूर्धर आजार झाल्याचे निदान झाल्यानंतर तक्कलवार कुटुंबातील सदस्यांनी खासदार हेमंत पाटील
यांच्या किनवट जनसंपर्क कार्यालयात जाऊन जनसंपर्क अधिकारी सुनिल गरड यांना मुलीच्या उपचारासाठी मदत व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.
त्यास खासदार हेमंत पाटील यांनी तात्काळ प्रतिसाद देत तक्कलवार कुटुबियांना मुलिच्या उपचारासाठी पंतप्रधान सहाय्यता निधीतून दोन लाख ४७ हजार ५०० रुपयाची मदत मिळवून दिली.
त्यानंतर या मुलीवर औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. आज किनवट तालुक्यातील ११ वर्षाची मुलगी उपचार घेऊन ठणठणीत बरी होऊन घरी परतली आहे.