*लोक क्रांती सेनेत माहूर तालुका अध्यक्ष पदी विष्णूकांत वाडगुरे यांची निवड*
माहूर वार्ता -
राजकीय व सामाजिक कार्याची दखल घेऊन लोक क्रांती सेनेत माहूर तालुका अध्यक्षपदी विष्णूकांत पांडुरंग वाडगुरे यांनी नुकतीच निवड करण्यात आली आहे.
आज दिनांक 31 ऑक्टोंबर सोमवार रोजी निवड करण्यात आली आहे.
सारखी येथून जवळच असलेले करंजी ( सेलू ) येथील रहिवाशी तरुण युवक विष्णूकांत पांडुरंग वाडगुरे यांनी राजकीय व सामाजिक कार्य करीत असतो.
गोरगरीब लोकांचे अडीअडचणीत सहभागी होऊन लोकांना छोटीमोठी मदत सुध्दा करीत असतो. याचीच दखल घेऊन
लोक क्रांती सेनेचे संस्थापक देवेंद्र पंडित पाटील यांच्या आदेशाने डॉ. सुनील देवरे
(प्रदेश संपर्कप्रमुख) यांच्या उपस्थितीत नुकतीच निवड केली आहे.