Ticker

6/recent/ticker-posts

किनवट शेरे ए हिंद हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त बाबाबाई मित्र मंडळाच्या वतीने आज उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना बाबाभाई यांच्या हस्ते फळे वाटप करण्यात आले या प्रसंगी रुग्णालयाचे डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते


किनवट प्रतिनिधी
 शेरे ए हिंद हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त बाबाबाई मित्र मंडळाच्या वतीने आज उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना बाबाभाई यांच्या हस्ते फळे वाटप करण्यात आले या प्रसंगी रुग्णालयाचे डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते


शेरे हिंद हजरत टिपू सुलतान यांचा जयंती सोहळा आज विविध संघटनेमार्फत किनवट शहरात वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा करण्यात आला

 या जयंतीनिमित्त सामाजिक कार्यकर्ते तथा युवा उद्योजक बाबा भाई मित्र मंडळ किनवट यांच्यावतीने आज गोकुंदा येथील टिपू सुलतान चौकात हजरत टिपू सुलतान 


यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात बाबा भाई यांच्या हस्ते रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.


  टिपू सुलतान हे सच्चे देशभक्त होते. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.हजरत टिपू सुलतान यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून 

युवकांनी देशाच्या रक्षणासाठी एकत्रितपणे लढा देणे आवश्यक असल्याचे मत बाबाभाई यांनी यावेळी व्यक्त केले आहे.


याप्रसंगी बाबाभाई मित्र मंडळाचे इंद्रदीप वाघमारे, शिवा पवार, नदीम शेख, सय्यद बब्बू, शेख अलाउद्दीन, मोबीन खान, 

शेख इंजु,शेख मोहसीन, शेख इस्माईल, शेख कलीम, अहमद पाशा, शरफुद्दीन शेख, शेख शरीफ भाई यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते