Ticker

6/recent/ticker-posts

*धनगर आक्रोश मेळाव्यास नांदेड जिल्ह्यातील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे-अमन कुंडगीर**जय मल्हार युवा मंच, महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने जाहीर पाठींबा*


*धनगर आक्रोश मेळाव्यास नांदेड जिल्ह्यातील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे-अमन कुंडगीर*
*जय मल्हार युवा मंच, महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने जाहीर पाठींबा* 

6 नोव्हेंबर रोजी होणार्‍या धनगर आक्रोश मेळाव्यास जास्तीत जास्त संख्येने समाजबांधवांनी उपस्थित रहावे. धनगर समाजातील उपेक्षित गरीब, कष्टकरी,

 बांधवांना आरक्षण मिळाल्याने त्यांचे जीवनमान बदलून त्यांना शासनाच्या विविध सोयी, सुविधा, सवलती उपलब्ध होतील. 

धनगर समाजाच्या प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी माजी खासदार पद्मश्री डॉ.विकासजी महात्मे यांच्या नेतृत्वात होणार्‍या धनगर आक्रोश मेळाव्यास जास्तीत जास्त समाजबांधवांनी उपस्थित राहून मेळावा यशस्वी करावा. 
धनगर समाजाला अनु.जमातीच्या धर्तीवर आरक्षण देण्यात यावे, धनगर समाजाच्या मुलामुलींना शिष्यवृती, समाजबांधवांना घरकुल योजना, मेंढपाळ समाजाला शासनाकडून मेंढ्या चराईसाठी पासेस, 

तसेच अहमदनगर जिल्हयाचे नामांतर करून अहिल्यादेवी होळकर नगर असे नामकरण करण्यात यावे. 

यासह विविध मागण्यांची पुर्तता शासनाला वेठीस धरून करण्यात येणार आहे. 

धनगर समाज आक्रोश मेळाव्यास जय मल्हार युवा मंच, महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने जाहीर समर्थन व पाठींबा दर्शविण्यात आला आहे.