आजपासून ग्रामीण रुग्णालय माहुर येथे मोफत वैद्यकीय व दंत महा आरोग्य शिबिराचे आयोजन*
*शिबिरासाठी विविध नामवंत तज्ञ डॉक्टर व सर्जन राहणार उपस्थित*
शिबिराची तयारी पूर्ण,
माहुर तालुका प्रतिनिधी बजरंगसिंह हजारी दि.२२ नोव्हें.
:-राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत शासकीय ग्रामीण रुग्णालय माहुर येथे दि.२२ ते २५ नोव्हेंबर या कालावधी दरम्यान भव्य मोफत वैद्यकीय व दंत महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले
असून,शिबिराचे उद्घाटन आज मंगळवार दि.२२ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता होणार आहे.
आदिवासी बहुल माहुर व किनवट तालुक्यासह परिसरातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा,असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. विद्या झिने यांनी केलेले आहे.
सदरील शिबीरात रुग्णांना आपल्या नावाची नोंदणी मंगळवार दि.२२ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत करता येणार असून,त्यानंतर सायंकाळी ४ वाजेपर्यंत नोंदणी झालेल्या रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे.
तपासणी नंतर शस्त्रक्रियेसाठी आवश्यक त्या रुग्णांची शस्त्रक्रिया ही दि.२३ ते २५ नोव्हेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत करण्यात येणार आहे.
सदरील शिबीरासाठी स्कील मिक्स सेवे अंतर्गत आरोग्य सेवेतील शासकीय व श्री गुरू गोविंदसिंघ सामान्य रुग्णालय,
नांदेड येथील सर्व विशेष तज्ञ डॉक्टर दि.२२ नोव्हेंबर रोजी रुग्णांची तपासणी करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. शिबीरात हायड्रोसिल (अंडवृद्धी),हार्निया,अपेंडीक्स, शरीरावरील सर्व गाठीचे शस्त्रक्रिया व दंत चिकित्सा औषधोपचार हे मोफत करण्यात येणार आहे.
पस्तीस वर्षांवरील सर्व महिलांचे गर्भाशयमुख व स्तन कॅन्सर तपासणी व उपचार,मानसिक आजार व तपासणी उपचार,दंत चिकित्सा व उपचार,उच्च रक्तदाब ( बि.पी) शुगर चिकित्सा केली जाणार आहे
.रुग्णांचे एक्सरे,ईसीजी,सोनोग्राफी व रक्त तपासणी इत्यादी मोफत केली जाणार आहे.
यासाठी ग्रामीण रुग्णालय माहुरच्या वतीने शस्त्रक्रिया गृह सुसज्ज व
सर्व सोईंनी परिपूर्ण ठेवण्यात आले असून,येथील अॉपरेशन थिएटर मध्ये (शस्त्रक्रिया गृह) नांदेड जिल्ह्यातील नामांकित सर्जन व भुलतज्ञांच्या देखरेखीखाली रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे अॉपरेशन साठी लागणारे साहित्य व औषधोपचार हे शिबीरात मोफत पुरविल्या जाणार आहे.
सदरील शिबीराचा माहुर सह किनवट तालुक्यातील व परिसरातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील गोरगरीब गरजू रुग्णांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन उपसंचालक आरोग्य सेवा लातूर
डॉ.श्रीमती कमल चामले,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे,वैद्यकीय अधिक्षक शा.ग्रा. रु.माहुर,मांडवी,हिमायतनगर,
उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा,तालुका आरोग्य अधिकारी किनवट,माहुर, हिमायतनगर यांचेसह सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी,राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम वैद्यकीय अधिकारी,
सर्व आशा कार्यकर्त्या,अंगणवाडी सेविका,ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रातील