*मी बोलून दाखवीत नाही तर,विकास कामे करून दाखवीन..... उकंडराव जाधव*
माहूर - ( दैं. हिंदूसम्राट प्रतिनिधी )
लोकरवाडी गट ग्राम पंचायत मनिरामथड येथे गेल्या दहा वर्षात फक्त आश्वासन देऊन निवडणूक निवडून आलेल्या सरपंच व संपूर्ण पॅनलला उकंडराव जाधव यांनी इशारा दिले आहे.
गेल्या दहा वर्षात कोणतेच विकास कामे केले नाहीत. जनतेने मला संधी दिली आहे ते मी दिवसरात्र करून जनतेचे विकास कामे करून दाखवीन
असे प्रतिपादन नुकतेच निवडून आलेल्या पॅनल प्रमुख तथा सेवा सहकारी सोसायटी चेअरमन श्री. उकंडराव जाधव यांनी केले आहे.
गोर गरीब जनता अजून किती तरी त्यांच्या हक्क त्यांना शासनाकडून मिळणारे विकास कामे पासून वंचित आहेत.
त्यांना मिळणारे सवलती व गावातील विकास काम कोणतेच झाले नसल्याने ते काम मी करून दाखवीन असे मत जाधव यांनी मांडले आहे.
जनता माझ्या संपूर्ण पॅनलला भरघोस मतांनी निवडून दिले.
लोकांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न, विकास काम त्यांचे हक्क मिळवून देण्याचे काम मी दिवसरात्र एक करून लोकांना न्याय मिळवून देईल असे वक्तव्य जाधव यांनी केले .
लोकरवाडी येथे आज दिनांक १३ ऑक्टोंबर सोमवार रोजी जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकीचे खोदकाम करीत असताना उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
जनतेचा प्रेम माझ्यावर खुप असल्याकारणाने त्यांचा हा विश्वास, प्रेम व त्यांचा आशीर्वादाने मी ही निवडणूक संपूर्ण सदस्यासह भरघोस मतांनी निवडून आलो.
सर्व जनतेचे अपूर्ण राहिलेले विकास कामे व त्यांचे हक्क त्यांना मिळवून देईल.गावात सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले असून या जल जीवन मिशन अंतर्गत उद्घाटन प्रसंगी देवराव आडे,