Ticker

6/recent/ticker-posts

किनवट कृषि पंपाच्या थकीत बिलाचा भरणा करावा म्हणून वीज वितरण कंपनीने गावोगावी दवंडी व मेसेजद्वारे सूचना दिल्या आहेत भरणा न केल्यास कृषि पंपाचा वीज पुरवठा तोडला जाणार आहे


किनवट कृषि पंपाच्या थकीत बिलाचा भरणा करावा म्हणून वीज वितरण कंपनीने गावोगावी दवंडी व मेसेजद्वारे सूचना दिल्या आहेत भरणा न केल्यास कृषि पंपाचा वीज पुरवठा तोडला जाणार आहे 

ही मोहीम लवकरच हाती घेण्याच्या तयारीत विद्युत मंडळ असल्याने रब्बी हंगामावर याचा परिणाम होणार आहे आधीच तालुक्यावर उदभवलेले आस्मानी संकट त्यातच ओल्या दुष्काळाची परिस्थिती 

यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असतानाच वीज वितरण कंपनीचे हे नवे संकट शेतकऱ्यांना चिंतीत करणारे आहे किनवट  सलग तीन वर्षांपासून 

किनवट तालुक्यावर दुष्काळाची गडद छाया कायम असून यावर्षीतर पावसाळ्यात पावसाने कहर करून खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला आहे जिरायती पिकांचे उत्पन्न घटल्याने शेतकरी चिंतीत झाला आहे 

तालुक्याची सुधारित पैसेवारी ४७ टक्के इतकी निघाली आहे कापूस ,सोयाबीन पिकाचा उतारा प्रचंड घटला आहे अशा परिस्थितीत वीज वितरण कंपनीने वसुलीची मोहीम हाती घेत डिशकनेकट करण्याच्या हालचालींना वेग आला आहे 

पिके हातून गेली उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे आस्मानी संकटा बरोबरच आता मानव निर्मित संकट उभे टाकणार असल्याचे चित्र आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा आयोगाला उद्देश सफल होण्याच्या दृष्टीने उत्पन्नात वाढ व्हावी 

दर्जेदार उत्पन्न मिळविणे यासाठी शेतीला अखंडित वीजपुरवठा करावा शेतकऱ्यांची थेट कोणतीही वीज बंद करू नये, तोडू नये यासाठी राज्य सुरक्षा आयोगाने आदेश पारित केले आहे आयोगाने शासनाला देखील सूचना केली आहे 

तसेच शेती उत्पादन उत्पादकता वाढविण्यासाठी अखंडित वीज पुरवठा पुरविण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात असे सुचवले असतानाही कनेक्शन कट करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत

 किनवट तालुक्यावर ओढावलेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्याची मागणी माजी आमदार प्रदीप नाईक यांनी केली आहे