Ticker

6/recent/ticker-posts

आज-काल कर्नाटक आणि आंध्रा बॉर्डर जवळील अनेक गावचे नागरीक महाराष्ट्राला सोडून तिकडे जाण्यासाठी इच्छूक आहेत कारण कर्नाटक सरकारने शेतकऱ्यांची विद्यूत मोफत व रोज 12 तास दिवसा दिली पण महाराष्ट्रात आठ तास त्यात चार वेळेस लाईट जाते व रात्रीला लाईट राहते


आज-काल कर्नाटक आणि आंध्रा बॉर्डर जवळील अनेक गावचे नागरीक महाराष्ट्राला सोडून तिकडे जाण्यासाठी इच्छूक आहेत कारण कर्नाटक सरकारने शेतकऱ्यांची विद्यूत मोफत व रोज 12 तास दिवसा दिली पण महाराष्ट्रात आठ तास त्यात चार वेळेस लाईट जाते व रात्रीला लाईट राहते 

त्यामुळे शेतकरी जीव धोक्यात घालून आपल्या शेताला पाणी देण्याचे काम करतात.*कर्नाटक व आंध्रा मध्ये शेतकऱ्यांना कर्ज सहज उपलब्ध होते .शेतकऱ्यांना पाईप लाईन सुद्धा मोफत करून दिली जाते तसेच रस्ते चांगले आहेत , 

शिक्षणाच्या सोयी चांगल्या आहेत* त्यामुळे नागरिकातील असंतोष उफाळून येत असल्यामुळे ते कर्नाटक आणि आंध्रात जाण्यासाठी ग्रामपंचायत तर्फे ठराव घेत आहेत .यात नागरिकांचा काय दोष

 .*महाराष्ट्रातील राजकीय मंडळी नागरिकांचे मूलभूत प्रश्न बाजूला सारून फुजूल विषयाला जास्त हवा देतात* 

.आणि नागरिकांचे प्रश्न बाजूला पडतात आणि त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष उफाळून येऊन मग ते शेजारील राज्यांमध्ये जाण्यासाठी ठराव घेत आहेत . *महाराष्ट्रातील नेत्यांनी जागे होऊन जनतेसाठी काम केले पाहिजे

 . निवळ जनतेच्या हितासाठी काम करतो असे बोलून चालणार नाही तर प्रत्यक्षात कृती करून दाखवावी लागेल तरच महाराष्ट्रात राहण्याचा नागरिक विचार करतील* महाराष्ट्रातील नेते फक्त डरकाळी फोडतात करत काहीच नाहीत 

. त्यामुळे महाराष्ट्रातील नेत्यांनी कितीही डरकाळ्या फोडल्या तरी आज  सीमा वर्ती भागातील नागरिक कर्नाटक अन् आंध्रामध्ये जाण्यास उत्सुक असल्याचे दिसून येत आहे- 

या नकारात्मक भावनेचा महाराष्ट्रातील नेते मंडळी कधी विचार करणार आहेत की नाही कि मारेंगे तोडेंगेची भाषा बोलत राहणार ?😁😁😁💐💐💐💐

डॉ अंबेजोगाईकर उमरखेड