Ticker

6/recent/ticker-posts

किनवट : बुधवार (दि.14 ) रोजी तहसिल कार्यालयात तयार केलेल्या विशेष कक्षात रविवार (दि.18 ) रोजी होणाऱ्या तालुक्यातील 52 ग्रामपंचायत निवडणूकीसाठी 165 मतदान केंद्रासाठीची मतदान यंत्रे सिलिंग प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

तालुक्यातील 52 ग्रामपंचायत निवडणूकीसाठी 165 मतदान केंद्रासाठीची मतदान यंत्रे सिलिंग प्रक्रिया पूर्ण

किनवट : बुधवार (दि.14 ) रोजी तहसिल कार्यालयात तयार केलेल्या विशेष कक्षात रविवार (दि.18 ) रोजी होणाऱ्या तालुक्यातील 52 ग्रामपंचायत निवडणूकीसाठी 165 मतदान केंद्रासाठीची मतदान यंत्रे सिलिंग प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
       
 निवडणूक प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार डॉ. मृणाल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार मोहम्मद रफीक , मास्टर ट्रेनर उत्तम कानिंदे व मल्लिकार्जून स्वामी 

यांनी 13 टेबलवर 13 फेर्‍यामध्ये मतदान यंत्राला मतपत्रिका लावून निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावरील सिलिंग प्रक्रिया पूर्ण करवून घेऊन मतदान घेण्यासाठी मतदान यंत्रे तयार केलीत. 

यावेळी रोऑफिसर म्हणून मंडळ अधिकारी एम. डी. वांगीकर व दाऊदखान यांनी काम पाहिले.
     
   ही प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी निवडणूक विभागाचे नितीन शिंदे, व्ही. टी. सूर्यवंशी, संदीप पाटील, 

आदिंसह सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, मास्टर ट्रेनर, तलाठी, कोतवाल, शिपाई  यांनी परिश्रम घेतले.